Friday, September 4, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूरात प्रथमच : विश्वशांतीसाठी श्रीयंत्र कोटी कुंकुमार्चन उत्सव १७ मार्चपासून ; श्री श्री सद्गुरु बसवारूढ महास्वामीजी मठ ट्रस्टचा उपक्रम :

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
10 March 2023
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : श्री श्री सद्गुरु बसवारूढ महास्वामीजी मठ ट्रस्टतर्फे सद्गुरू श्रो. ब्र. श्री. ईश्वरानंद महास्वामीजी यांच्या संकल्पनेतून १७ ते १९ मार्च दरम्यान विश्वशांतीसाठी श्रीयंत्र कोटी कुंकुमार्चन उत्सव व मठाचे लोगो अनावरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती श्री श्री सद्गुरु बसवारूढ महास्वामीजी मठाचे मठाधिपती सद्गुरु श्रो. ब्र. श्री शिवपुत्र महास्वामीजी यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत दिली. मठ यंदा ५० व्या वर्षांत पदार्पण करत असल्यानिमित्त विमानतळाच्यामागील श्री बसवारूढ मठात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

एक हजारहून अधिक महिलांच्या हस्ते श्रीयंत्र कोटी कुंकुमार्चन करण्यात येणार आहे. अशा प्रकारचा कार्यक्रम सोलापूरात प्रथमच होत आहे. मुंबईच्या संन्यास आश्रमाचे प. पू. आचार्य महामंडलेश्वर श्री स्वामी विश्वेश्वरानंद गिरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत हा संपूर्ण उत्सव करण्यात येणार आहे.

कुंकूमार्चन कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या सर्व महिलांना मठाचे संस्थापक सद्गुरु श्रो. ब्र. श्री ईश्वरानंद महास्वामीजी यांच्या अमृतहस्ते शास्त्रोक्त पद्धतीने सिद्ध केलेले श्रीयंत्र देण्यात येणार आहे.

शुक्रवार, १७ मार्च रोजी दुपारी ४ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत कुंकुमार्चन व त्यानंतर आरती महाप्रसाद होणार आहे. शनिवार, १८मार्च रोजी दुपारी ४ ते सायंकाळी ७ पर्यंत कुंकूमार्चन, १ हजार महिलांची ओटी भरण्याचा कार्यक्रम तसेच हळदीकुंकू कार्यक्रम होणार आहे. यावेळी ऋतुजा कुलकर्णी यांचा कथकनृत्य कार्यक्रम व महाप्रसाद होईल. उत्सवाच्या शेवटच्या दिवशी रविवार, १९ मार्च रोजी सकाळी ७ वाजता श्री महालक्ष्मी हवन होणार आहे. सकाळी ९ ते दुपारी १२ यावेळेत धर्मसभा आणि मठाचा लोगो अनावरण कार्यक्रम होईल. दुपारी १२ ते एक वाजेपर्यंत हवन पूर्णाहुती व श्रीयंत्र वाटप महाप्रसाद हे कार्यक्रम होणार आहेत. श्रीयंत्र कोटी कुंकूमार्चन उत्सवात कुंकुमार्चनासाठी अधिकाधिक महिला भगिनींनी सहभागी व्हावे, असे आवाहन मठाधिपती सद्गुरु श्रो. ब्र. श्री शिवपुत्र महास्वामीजी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ९०२१५२९९७० किंवा ९१४६४८०७३८ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही संयोजकांनी केले आहे.

या पत्रकार परिषदेस वेदमूर्ती बसवराज शास्त्री हिरेमठ, संजय हिरेहब्बू, माजी महापौर शोभा बनशेट्टी, माजी महापौर नलिनी चंदेले, श्रीशैल बनशेट्टी, महापालिकेचे माजी सभागृह नेते सुरेश पाटील, शिवसेनेचे माजी शहरप्रमुख गुरुशांत धुत्तरगावकर, सिद्धाराम खजूरगी उपस्थित होते.

————-

१५०० श्रीयंत्र अन् तब्बल २ क्विंटल कुंकू

श्रीयंत्र कोटी कुंकुमार्चन उत्सवासाठी १५०० श्री यंत्र मागवण्यात आले असून करमाळ्यातील केम येथून तब्बल २ क्विंटल कुंकू घेण्यात आले आहे. श्रीयंत्र कोटी कुंकुमार्चन कार्यक्रमात एक हजारहून अधिक महिला सहभागी होणार आहेत.

SendShareTweetSend
Previous Post

ग्रामसेवक पुरस्कार विभागून म्हणजे ‘ऍडजेस्टमेंट’ ; असा चुकीचा पायंडा पडणार नाही ; शेळकंदे आपल्या भूमिकेवर ‘स्टेकअप’

Next Post

हे विठ्ठला ! पंतप्रधान नरेंद्र मोदींना सद्बुद्धी दे ; राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीने यासाठी केले भजन आंदोलन

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

हे विठ्ठला ! पंतप्रधान नरेंद्र मोदींना सद्बुद्धी दे ; राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीने यासाठी केले भजन आंदोलन

ताज्या बातम्या

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026

क्राईम

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

1998436
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group