सोलापूर : जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी राज्यातील 18 लाख हून अधिक शासकीय व निमशासकीय कर्मचारी बेमुदत संपावर आहेत सोमवारी संपाचा सातवा दिवस होता एकीकडे आपण संपात सहभागी असल्याचे दाखवतात मात्र दुसरीकडे मलाईदर फायली काढण्यासाठी याच कर्मचाऱ्यांची धडपड का? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.
सध्या सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये शुकशुकाट पाहायला मिळतो. कर्मचारी कार्यालयात नसल्याने सर्वसामान्य नागरिक झेडपीकडे फिरकत नाहीत परंतु जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग आपले कार्यालय सोडून बाहेरच्या ठिकाणी कामकाज करीत असल्याचे निदर्शनास आला आहे. चोरून आणि गुपचूप असे कामकाज का? असा प्रश्न उपस्थित होत असून शैक्षणिक मान्यतेच्या मलाईदार फायली काढून त्या सह्या करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे.
यासाठीच शिक्षणाधिकारी जावीर हे सर्व विस्तार अधिकाऱ्यांना घेऊन नेहरू वसतिगृहात आपले कामकाज करतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. याची माहिती जेव्हा संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळाली तेव्हा कर्मचाऱ्यांमधून संताप व्यक्त करण्यात आला आणि त्यांचे कामकाज करतानाचे फोटो व्हायरल करण्यात आले आहेत.
काही महिन्यांपूर्वी शिक्षण विभागातील ‘गामुका’ अशा काही कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली होती. त्यातील ‘गामु’ हे दोन कर्मचारी अजूनही शिक्षण विभागाचं काम पाहत आहेत अशी ही माहिती समोर आली आहे. एकीकडे मी नाही त्यातला असे म्हणायचे आणि दुसरीकडे मलाईदार फायली काढण्यासाठी कर्मचाऱ्यांना घेऊन बसायचे असे कामकाज प्राथमिक शिक्षणअधिकाऱ्याचे सुरू आहे.

















