या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली आणि कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घेत असल्याची घोषणा केली आहे. जुनी पेन्शन योजना लागू होईल, असं आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलं आहे. त्यानंतर संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या मंगळवारपासून कर्मचारी कामावर परत येणार आहे.
दरम्यान, या घोषणेमुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यास गती मिळणार आहे. तर, गेल्या ६ दिवसांपासून रुग्णालयात होत असलेल्या रुग्णांची गैरसोय दूर होऊन सुरळीत उपचार सुरू होती. त्यासोबतच, शासकीय कार्यालयात नागरिकांना पुन्हा सेवा सुरू होणार असून शाळा, कॉलेजेस आणि विद्यार्थ्याच्या परीक्षांवर होणारा परिणाम दूर होईल.

















