सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील बळेवाडी येथील अनुसूचित जमातीच्या झालेल्या बलात्काराच्या निषेधार्थ भीम आर्मी संघटनेच्या वतीने सोलापुरात उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे सहन करण्यात आले.
भीम आर्मी संघटनेचे शहराध्यक्ष अजय मैदर्गीकर, जिल्हाध्यक्ष मिलिंद प्रक्षाळे, महिला आघाडीच्या विशाखा उबाळे, अनिता गायकवाड प्रहार संघटनेच्या जिल्हाध्यक्ष संजीवनी बारंगुळे, तालुका अध्यक्ष सोनाली गायकवाड, आरती कांबळे, लक्ष्मी माने, जोत्सना गोरटे आणि पीडितेची यांच्या उपस्थितीत हे आंदोलन झाले.
या घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी संबंधित पोलीस अधिकारी व हेड कॉन्स्टेबल यांना सह आरोपी करून फौजदारी गुन्हे दाखल करावेत, पीडीताही अपंग झाल्यामुळे तिच्या उदरनिर्वाहासाठी 50 लाख रुपये शासनाने रक्कम द्यावी अशा भीम आर्मी संघटनेच्या मागण्या आहेत.
यावेळी अजय मैंदर्गीकर म्हणाले, राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपल्या पत्नीसाठी अधिवेशनात बोलायला वेळ आहे पण एका मागासवर्गीय मुलीवर झालेला बलात्कार त्यांना दिसत नाहीत. आमच्या मागण्या आठ दिवसात मान्य न केल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.

















