26 जानेवारी ते 19 फेब्रुवारी भाजयुमोचे युवा सदस्य नोंदनी अभियान
भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब, कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब व भाजपाचे सरचिटणीस आमदार विक्रांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनुप मोरे यांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण राज्यामध्ये 18 ते 25 वयोगटातील युवांसाठी विशेष सदस्यता मोहीम राबविण्यात येणार आहे.
26 जानेवारी प्रजासत्ताक दिन पासून ते 19 फेब्रुवारी शिवजयंती पर्यंत संघटन पर्व अंतर्गत 18 ते 25 वयोगटातील युवांसाठी विशेष सदस्यता मोहीम राबविण्यात येणार आहे.
– 26 जानेवारी – प्रजासत्ताक दिन निमित्त भारत मातेचे पूजन करून चौका चौकात सदस्य मोहीम राबवण्यात येईल.
– 1 फेब्रुवारी – गणेश जयंती निमित्त ठिकठिकाणी गणेश मंडळ असतील व गणपती मंदिर असतील त्या ठिकाणी स्टॉल लावून सदस्यता नोंदणी करण्यात येणार आहे.
– 2 फेब्रुवारी – वसंत पंचमी निमित्त सरस्वती पूजन करून चौका चौकात सदस्य मोहीम राबवण्यात येईल.
– 19 फेब्रुवारी – शिवजयंती निमित्त ज्या ठिकाणी शिवजयंती साजरी करण्यात येत आहे त्या चौकात सदस्य नोंदणी स्टॉल लावून सदस्यता नोंदणी करण्यात येणार आहे.
📍माळशिरस
संघटन पर्व
विशेष अभियान युवा सदस्य नोंदणी
26 जानेवारी ते 19 फेब्रुवारी
संघटन पर्व अंतर्गत विशेष सदस्य नोंदनी अभियानासाठी भाजपा युवा मोर्चा वतीने घेण्यात येणाऱ्या आगामी कार्यक्रमा संदर्भात सोलापूर पश्चिम जिल्ह्यातील युवा मोर्चा पदाधिकार्यांची बैठक माळशिरस येथे संपन्न झाली.
या बैठकीत विधानसभा निहाय युवा मोर्चा वतीने घेण्यात आलेल्या सदस्य नोंदणीचा आढावा घेण्यात आला तसेच दिनांक 26 जानेवारी ते 19 फेब्रुवारी पर्यंत 18 ते 25 वयोगटातील युवकांची सदस्य नोंदणी करण्यासंदर्भात प्रामुख्याने चर्चा झाली. तसेच प्रजासत्ताक दिन, फेब्रुवारी महिन्यातील येणारी शिवजयंती उत्सव, गणेश जयंती या सणानिमित्त सदस्यता अभियान नोंदणीसाठी उपक्रम राबवण्याबद्दल देखील चर्चा झाली.
यावेळी प्रदेश सचिव अजित कुलथे,सोलापूर पश्चिम जिल्हा प्रभारी तथा प्रदेश सचिव अक्षय अंजिखाने,सोलापूर पश्चिम जिल्हा अध्यक्ष शिवराज पुकळे,महामंत्री स्वप्नील राऊत,जिल्हा पदाधिकारी व तालुका पदाधिकारी उपस्थित होते.