सोलापूर झेडपीला आले 248 नवे शिक्षक ; आजपासून दोन दिवस शिक्षकांच्या कागदपत्रांची तपासणी ; कादर शेख सुट्टीत ठाण मांडून
सोलापूर : नव्याने रुजू झालेले सोलापूर जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख हे शनिवार आणि रविवारी दोन्ही दिवस कार्यालयामध्ये ठाण मांडून असल्याचे पाहायला मिळाले या दोन दिवसात त्यांनी शिक्षण विभागातील प्रलंबित कामांची माहिती घेतली खाजगी शाळांमधील शिक्षकांचे समायोजन आणि पवित्र पोर्टल द्वारे भरती झालेल्या नव्या 248 शिक्षकांच्या नियुक्ती संदर्भात आता प्रक्रिया राबवली जाणार आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेला शासनाने नव्याने भरती प्रक्रियेतून पवित्र पोर्टल द्वारे मराठी माध्यम साठी नव्याने 223, कन्नड माध्यम साठी 10 व उर्दू माध्यम साठी 15 असे एकूण 248 शिक्षक जिल्हा परिषदेला या भरतीतून मिळाले आहेत.
या नव्याने आलेल्या शिक्षकांच्या कागदपत्राची तपासणी सोमवार आणि मंगळवारी चालणार आहे. ही तपासणी जिल्हा परिषदेच्या नेहरू वसतिगृह या ठिकाणी होणार असून सोमवारी 1 ते 125 आणि मंगळवारी 126 ते 248 एवढ्या शिक्षकांची कागदपत्रे तपासली जाणार आहेत अशी माहिती शिक्षण विभागाकडून मिळाली.