Saturday, June 27, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर : सिध्देश्वर’कारखान्याच्या निवडणूकीत हे आहेत बिनविरोध 20 संचालक

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
14 December 2021
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 “कर्मयोगी अप्पासाहेब काडादी यांनी शेतकर्‍यांच्या समृध्दीसाठी आणि कल्याणासाठी मोठ्या परिश्रमाने स्थापन केलेल्या श्री सिध्देश्वर साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी अनेक इच्छुकांनी स्वयंस्फूर्तीने माघार घेतली. त्यामुळे कारखान्यावरील पडणारा लाखो रुपयांचा बोजा टळला. शिवाय महाराष्ट्रात निवडणूक बिनविरोध करून एक नवा आदर्श निर्माण केला. तेव्हा बिनविरोध निवडणूक होण्यासाठी सहकार्य करणार्‍या सर्व इच्छुकांचे आणि कार्यक्षेत्रातील सर्वपक्षीय नेत्यांचे मनपूर्वक आभार”.धर्मराज काडादी

सोलापूर- संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या श्री सिद्धेश्वर सहकारी मल्टीस्टेट साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणुक अखेर संगमेश काडादी यांच्या मनधरणी नंतर रात्री उशिरा बिनविरोध झाली काडादी कुटुंबियातील अंतर्गत वाद या निवडणुकीच्या माध्यमातून मिटल्याचे दिसून आलं. हे वाद मिटवण्यासाठी मागील तीन दिवसांपासून बाजार समिती संचालक आप्पासाहेब पाटील, सिद्धाराम चाकोते, किणीचे अशोक पाटील, महादेव पाटील, मल्लिनाथ सोलापुरे, प्रभुराज मैंदर्गिकर गणेश चिंचोळी, हे प्रयत्न करत होते माजी जिल्हा परिषद सभापती आप्पाराव कोरे यांनी सुद्धा शेवटच्या क्षणी प्रयत्न केले.

ही निवडणूक बिनविरोध झाल्याने कारखान्याने महाराष्ट्रात बिनविरोधचा नवा आदर्श निर्माण केला आहे. संचालक मंडळात विद्यमान आठ संचालकांचा समावेश आहे.

सर्वसाधारण मतदारसंघात कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्यासह गुरुराज माळगे (दर्शनाळ), सिध्दाराम चाकोते (सोलापूर), शिवशंकर बिराजदार (कुंभारी), अमर पाटील (बरूर), सुरेश झळकी (शेगाव) हे सहा विद्यमान संचालक याशिवाय राजशेखर पाटील (कोरवली), अशोक पाटील (किणी), विलासराव पाटील (चुंगी), अरुण लातुरे (सोलापूर), मल्लिकार्जुन ऊर्फ प्रमोद बिराजदार (निंबर्गी), विद्यासागर मुलगे (वडकबाळ), शंकर पाटील (गौडगांव), सिध्दाराम व्हनमाने (कुसूर), शिवानंद पाटील (कुडल) हे बिनविरोध निवडून आले.

संस्था मतदारसंघातील एका जागेसाठी अण्णाराज ऊर्फ पुष्पराज काडादी हे विद्यमान संचालक बिनविरोध निवडून आले.

महिला मतदारसंघात मंगला काडादी (देगाव) आणि श्रीदेवी माशाळे (बोरामणी) यांची बिनविरोध निवड झाली.

अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघात मलप्पा चांभार (तोळणूर) या विद्यमान संचालकांसह काशीनाथ कोडते (कलकर्जाळ) हे बिनविरोध निवडून आले.

कारखान्याच्या 20 जागांसाठी 117 उमेदवारांचे अर्ज वैध ठरविण्यात आले होते. परंतु 97 इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज माघार घेतले. त्यात विद्यमान उपाध्यक्ष अ‍ॅड. दीपक आलुरे, संगमेश्वर काडादी, सिद्रामप्पा अबदुलपूरकर, शिवाजी इंगळे, सुधीर लांडे, श्रीशैल वाले आदी इच्छुकांनी उमेदवारी अर्ज मागे घेऊन निवडणूक बिनविरोध करण्यास सहकार्य केले.

सोमवारी सायंकाळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांनी सर्व 20 उमेदवारांची नावे जाहीर केली.

कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाल्याचे समजताच काडादी यांच्या ‘गंगा’ या निवासस्थानी सभासदांनी तसेच कार्यक्षेत्रातील नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून आणि पेढे वाटून जल्लोष केला. कारखान्याचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांचा निवडणूक बिनविरोध केल्याबद्दल सभासदांनी अपूर्व उत्साहात शाल व पुष्पहार घालून सत्कार केला. त्यानंतर सर्व नूतन संचालकांनी ग्रामदैवत सिध्देश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले.

ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी माजीमंत्री सिध्दाराम म्हेत्रे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, श्री स्वामी समर्थ सूतगिरणीचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे, माजी आमदार सिद्रामप्पा पाटील, दिलीप माने, रतिकांत पाटील, शिवशरण बिराजदार तसेच अप्पासाहेब पाटील- वडकबाळकर आदींनी मोलाचे सहकार्य केले.

कारखान्याची निवडणूक यापूर्वी 2006 मध्ये बिनविरोध झाली होती. त्यानंतर आता 15 वर्षानंतर अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक बिनविरोध झाली.

शेतकर्‍यांचे हित डोळ्यासमोर ठेवून आणि कारखान्याच्या प्रगतीसाठी आमचे थोरले बंधू धर्मराज काडादी यांना पाठिंबा दिल्याचे संगमेश्वर काडादी यांनी ‘गंगा निवास’  येथे छोट्याशा सत्काराप्रसंगी सांगितले.

SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकींग : सोलापूरकरांनो, ‘omicron’ जवळ आला आता तरी लस घ्या……लातूरमध्ये आढळला रुग्ण

Next Post

मोठी बातमी : तर एमआयएम महापालिका निवडणुका लढवणार नाही | काय म्हणाले प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

मोठी बातमी : तर एमआयएम महापालिका निवडणुका लढवणार नाही | काय म्हणाले प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील

ताज्या बातम्या

अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

26 June 2026
धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

18 June 2026
धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

12 June 2026
सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026
बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026
आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

3 June 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

2 June 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

Our Visitor

1986183
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group