Saturday, October 17, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर ! सिद्धेश्वर यात्रा : आमदार संजय शिंदे व आमदार प्रणिती शिंदे यांचे प्रयत्न असफल ; प्रशासन आपल्या भूमिकेवर ठाम !

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
10 January 2021
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

12 जानेवारी पासून 16 जानेवारी पर्यंत सिद्धेश्वरांच्या यात्रेच्या प्रमुख धार्मिक विधी पार पडत असतात. मात्र या धार्मिक विधींवर देखील प्रशासनातर्फे मर्यादा घालण्यात आल्या आहेत. विभागीय आयुक्त कार्यालय यांच्यामार्फत पालिकेच्या आयुक्तांना सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी हे आदेश जारी केले आहेत. विविध राजकीय मंडळीनी यात्रेसाठी परवानगी मागताना 1 हजार लोकांना उपस्थित राहता यावे यासाठी मागणी केली होती. मात्र राजकीय मंडळीच्या या मागणीला प्रशासनाने फेटाळत यात्रेवर मर्यादा घातल्या आहेत. 12 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता हिरेहब्बू वाड्यात पहिल्या आणि दुसऱ्या नंदीध्वजाची पुजा होते. त्यानंतर यात्रेला प्रारंभ होतो. यात्रेतील प्रमुख सात काठ्यांना यावेळी सरकारतर्फे आहेर देखील दिला जातो. ब्रिटीश काळापासून हा मान चालत आलेला आहे. त्यानंतर नंदीध्वजांचा तैलाभिषेक घालून त्या लिंगाची विधीवत पूजा केली जाते. मानकऱ्यांना विड्याचा मान दिला जातो. त्यानंतर 68 लिंगास यन्नीमज्जन प्रारंभ होतो. यंदा मात्र या यन्नीमज्जन या धार्मिक विधीच्या मिरवणूकीस परवानगी देता येणार नाही. असे आदेश आयुक्त पी. शिवशंकर यांनी जारी केले आहेत. मात्र परंपरा जपण्याच्या दृष्टीने 11 तारखेलाच मानाचे 7 ही नंदीध्वज अगोदरच मंदिर परिसरात ठेवून तेथेच सजविण्यात यावे. केवळ मानकरी आणि पुजारी यांच्या उपस्थितीत विधीवत पूजा करण्यात यावी. प्रत्येक नंदीध्वजासमवेत 5 असे एकूण 35 व्यक्ती तसेच त्यांच्यासोबत इतर 15 पूजारी आणि मानकरी असे मिळून एकूण 50 व्यक्तींना परवानगी देण्यात आली आहे. या व्यक्तींची यादी समितीने दोन दिवस आधी पोलिस विभागाला सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर यन्नीमंजन या विधीसाठी 68 लिंगास योगदंडासह तैलाभिषेक करणेकामी योगदंडधार आणि 7 ध्वजाचे प्रत्येकी 1 मानकरी यांना परवानगी देण्याती आली आहे.

यात्रेचा सर्वात महत्वाचा विधी असलेल्या अक्षता सोहळ्यासाठी देखील मानकरी, पुजारी, नंदीध्वजधारक अशा केवळ 50 लोकांना परवानगी देण्यात आली आहे. दरवर्षी या विधीसाठी राज्यासह कर्नाटक, आंध्रप्रदेशातून लाखो भाविक उपस्थित असतात. मात्र या अक्षता सोहळ्यासाठी केवळ 50 लोकांना उपस्थित राहता येणार आहे. परवानगीबाबत प्रशासनामार्फत ओळखपत्र देखील देण्यात येणार आहेत. यात्रेचा प्रमुख आकर्षण असलेल्या शोभेचे दारुकाम कार्यक्रम दरवर्षी 15 जानेवारी रोजी पार पडत असतात. यंदा मात्र शोभेच्या दारुकामासाठी प्रशासनाने परवानगी पूर्णपणे नाकारली आहे. तसेच यात्रेचा शेवटचा दिवस असलेल्या कप्पडकळी कार्यक्रम मिरवणुकीस देखील प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. नंदीध्वजाची नगर प्रदक्षिणा मिरवणूक न काढता प्रतिकात्मक स्वरुपात सिद्धरामेश्वर योगदंड घेऊन मंदिर परिसरात पार पाडावेत अशा सूचना सोलापूर महानगर पालिकेतर्फे देण्यात आल्या आहेत.
दरम्यान यात्रा कालावधीत सिद्धेश्वर मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद करण्याच्या सूचना देखील प्रशासनाने दिल्या आहेत. तर अत्यावश्यक दुकाने वगळता करमणुकीची आणि मनोरंजन साधनांची दुकाने देखील बंद ठेवण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. तर पंरपरेनुसार चालत आलेले सर्व नित्योपचार देवस्थान समिती मार्फत करण्यात यावे अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. तसेच मंदिर परिसरात कोणीही भक्त येणार नाही याकरिता देवस्थान समितीने खासगी सुरक्षा रक्षक नेमावे. अशा सूचना देखील प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत. तर भाविकांना दर्शन घेता यावेत यासाठी धार्मिक विधी, नंदीध्वजाची पुजा, मिरवणुक, आरती, महापूजा यांचे थेट प्रक्षेपण सोशल मीडियावरुन करण्यात यावे, अशी सूचना प्रशासनाने दिली आहे.
यात्रेची परवानगी मिळवण्यासाठी करमाळाचे आमदार संजय शिंदे, सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे या दोघांमध्ये राजकीय श्रेयवाद पाहायला मिळाला होता. दोघांनीही यात्रेला किमान 1 हजार लोकांना परवानगी मिळावी यासाठी प्रयत्न केले. आयुक्त, जिल्हाधिकारीपासून थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापर्यंत हा विषय नेत अगदी प्रतिष्ठेचा मुद्दा तयार करण्यात आला होता. मात्र सर्वांच्या मागण्या फेटाळत विभागीय आयुक्तांनी यात्रेवर निर्बंध घालण्याचा निर्णय अखेरीस घेतला आहे.

SendShareTweetSend
Previous Post

शिक्षकांनो, कोरोनातून बाहेर पडा, नव्या जोमाने कामाला लागा : सीईओ दिलीप स्वामी

Next Post

सावधान ! बर्ड फ्लूबाबत सोलापूर महापालिकेने जारी केले महत्वाचे आदेश

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सावधान ! बर्ड फ्लूबाबत सोलापूर महापालिकेने जारी केले महत्वाचे आदेश

ताज्या बातम्या

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

16 October 2026
ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002565
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group