Friday, October 16, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस मोठी झेप घेण्याच्या तयारीत ; एवढ्या लाख सभासद नोंदणीचे उद्दिष्ट

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
24 December 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष  शरद पवार (sharad pawar) यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त  सबंध राज्यात राष्ट्रवादी सभासद नोंदणी अभियान सुरू करण्यात आले असून त्याअंतर्गत सोलापुरात सभासद नोंदणी अभियानाचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश संघटक सचिव तथा सोलापूर जिल्हा समन्वयक शेखर माने (shekhar mane) यांच्या हस्ते  करण्यात आले.

यावेळी शेखर माने यांनी उपस्थित पदाधिकारी कार्यकर्ते व पक्षप्रेमी यांची प्रार्थनीय उपस्थिती पाहून सोलापूर शहरातून एक लाख सभासद नोंदणीचे उद्दिष्ट नक्कीच अपेक्षित असून शहरातील सर्व राष्ट्रवादी पदाधिकारी ते नक्की पूर्ण करतील असा विश्वास व्यक्त केला.

सुरुवातीला मंचावरील सर्व प्रमुख मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले, सभासद नोंदणी अभियान कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहर कार्याध्यक्ष संतोष पवार(Santosh Pawar) यांनी करताना येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने बूथ कमिटी अधिक मजबूत करण्यासाठी पुढील तीन वर्ष (2021 ते 2023) काळासाठी ही सभासद नोंदणी अभियान आजपासून शहरात सर्वत्र राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाला मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त करताना ज्येष्ठ नेते महेश गादेकर, मनोहर सपाटे, शंकर पाटील, नलिनी चंदेले, सुनिता रोटे, जुबेर बागवान, जनार्दन कारमपुरी आदींनी सध्याचा काळ हा राष्ट्रवादीसाठी अत्यंत सुगीचा काळ असून राष्ट्रवादीचा प्रचार आणि प्रसार सर्वत्र होत असल्याचे सांगत येणाऱ्या निवडणुकीनंतर सोलापूर महानगरपालिकेवर राष्ट्रवादीची सत्ता व राष्ट्रवादीचाच महापौर होणार व त्यासाठी सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी एकनिष्ठेने कामाला लागावे व त्याकरिता आम्ही सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते तसेच सभासदांच्या पूर्ण पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे सांगितले.

शहराध्यक्ष भारत जाधव यांनी राष्ट्रवादीच्या या सभासद नोंदणी द्वारे आपण संपूर्ण शहराला तसेच राज्याला दाखवून देऊयात की शरद पवार साहेबांचे धोरण तसेच पक्षाचे विचार सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी समोर उपस्थित सर्व राष्ट्रवादी प्रेमी कंबर कसून कामाला लागले असून एक लाखाचे उद्दिष्ट नक्कीच पूर्ण करू असा विश्वास दिला. 

कार्यक्रमाच्या शेवटी सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष मिलिंद गोरे यांनी सभासद नोंदणी कशी करायची या संदर्भात संपूर्ण इत्यंभूत माहिती उपस्थित पदाधिकारी कार्यकर्त्यांना दिली.

पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष.जयंत पाटील यांचे अत्यंत विश्वासू असलेले सांगलीचेशेखर माने यांनी सांगलीत देखील राजकीय चमत्कार घडविला असून समन्वयक म्हणून त्यांनी सोलापूर मध्ये जबाबदारी स्वीकारल्यापासून सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यामध्ये एक नवचैतन्य निर्माण झाले आहे. प्रत्येक पदाधिकारी यांच्याशी त्यांनी वैयक्तिक संपर्क साधला असून यापुढील काळात सभासद नोंदणी बूथ कमिटी व मनपा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व पदाधिकाऱ्यांच्या समवेत नक्कीच सोलापूर शहरात एक राष्ट्रवादी विचार सर्वत्र पसरवण्याचे काम केले जाईल असे निक्षून सांगितले.

याच कार्यक्रमात शहरातील विविध पक्षातील सदस्यांचे पक्ष प्रवेश तसेच विविध सेलच्या नव नियुक्ती जाहीर करण्यात आले.

या कार्यक्रमाला  राजन जाधव चंद्रकांत पवार लता ढेरे लता फुटाणे  मंगल कोल्हे नंदा काँग्रे  बिस्मिल्ला शिकलगार चंद्रकांत पवार निशांत सावळे श्रीनिवास कोंडी बाबासाहेब जाधव जावेद खैरदी प्रकाश जाधव प्रशांत बाबर सुहास कदम अमीर शेख तनवीर गुलजार बसवराज कोळी आनंद मुस्तारे सोमनाथ शिंदे प्रमोद भोसले युवराज माने, ज्योतिबा गुंड रुपेश भोसले आशिष जेटीथोर लहू हावले शिवराज विभूते प्रकाश झाडबुके, गणेश छत्रबंद, मोबिन भेलमे, मौला शेख, लखन कांबळे फिरोज शेख सागर गव्हाणे सागर शितोळे खलिल शेख गफ्फुर शेख, सर्फराज शेख, अश्विनी भोसले, शशिकला कसपटे, गौरा कोरे, वंदना भोसले, पूजा वाकसे, शौर्या पवार, मुबीन शेख, वसीम बुरहान, फारुक शेख, मुसा अत्तार आदी व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तर विधानसभा अध्यक्ष प्रकाश जाधव यांनी तर आभार प्रदर्शन मध्य विधानसभा कार्याध्यक्ष बसवराज कोळी यांनी केले.

SendShareTweetSend
Previous Post

प्रभारी ‘भांजे’बनले झेडपीचे ‘कारभारी’ ; स्वामींचा ‘प्रकोप’अन् ‘लोहार’चा ‘हातोडा’ का नाही ; कुछ तो गडबड है दया…

Next Post

सोलापूरकरांनों इथे लक्ष द्या,,अन्न व औषध प्रशासनाचे नवे आदेश ; खाद्यपदार्थ बाबत घेतला हा निर्णय

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूरकरांनों इथे लक्ष द्या,,अन्न व औषध प्रशासनाचे नवे आदेश ; खाद्यपदार्थ बाबत घेतला हा निर्णय

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002501
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group