Saturday, June 27, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर विद्यापीठाच्या युवा महोत्सवात आर्चीचे आकर्षक ; महोत्सवाला येण्यापूर्वी आर्ची काय म्हणते पहा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
7 October 2022
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर, दि.7- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा अठरावा युवा महोत्सव दलित मित्र कदम गुरुजी सायन्स महाविद्यालय, मंगळवेढा येथे होणार असून रविवार, दि. 9 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी दहा वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली.

रविवारी सकाळी दहा वाजता पंढरपूर-मंगळवेढ्याचे आमदार समाधान आवताडे, सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील आणि माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या प्रमुख उपस्थित उद्घाटन सोहळा होणार आहे. रविवारी सायंकाळी सहा वाजता एकांकिका रंगमंचाचे उद्घाटन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या हस्ते होईल. 9 ते 12 ऑक्टोबर या कालावधीत नृत्य, नाट्य, ललित, वांग्मय, संगीत विभागातील एकूण 29  कलाप्रकारांचे सादरीकरण या युवा महोत्सवात होणार आहे. सुमारे 75 महाविद्यालये आणि जवळपास दोन हजार विद्यार्थी, कलाकारांचा यामध्ये सहभाग राहणार आहे.

युवा महोत्सवाच्या पहिल्या दिवशी रविवार, दि. 9 ऑक्टोबर रोजी सकाळी आठ ते रात्री दहापर्यंत नोंदणी, उद्घाटन सोहळा, संघ व्यवस्थापनकांची बैठक, मूकनाट्य, समूहगीत, कातरकाम, प्रश्नमंजुषा लेखी, मराठी-हिंदीइंग्रजी वक्तृत्व स्पर्धा, काव्यवाचन, भितीचित्रण, रांगोळी आणि एकांकिकेचे सादरीकरण होणार आहे. सोमवार, दि. 10 ऑक्टोबर रोजी शास्त्रीय नृत्य, सुगम गायन, पथनाट्य, स्थळचित्रण, वादविवाद, फोक आर्केस्ट्रा, शास्त्रीय सुरवाद्य, कथाकथन, मिमिक्री, स्पॉट फोटोग्राफी, एकांकिका (मराठी, हिंदी) आदी स्पर्धा पार पडतील. मंगळवार दि. 11 ऑक्टोबर रोजी प्रश्नमंजुषा तोंडी, निर्मिती चित्र, शास्त्रीय गायन, व्यंगचित्रण, लघुनाटिका, शास्त्रीय तालवाद्य, मातीकाम आणि लोकनृत्याच्या स्पर्धा रंगतील. 

बुधवार, दि. 12 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 9 वाजता शोभायात्रा पार पडल्यानंतर सकाळी अकरा वाजता पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे. सैराट फेम सिने अभिनेत्री रिंकू राजगुरू (आर्ची) यांच्या  हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक दिली जाणार आहेत.  

या पत्रकार परिषदेस प्र-कुलगुरू डॉ. राजेश गादेवार, कुलसचिव योगिनी घारे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ कळवणे, पत्रकारिता विभागप्रमुख डॉ. रवींद्र चिंचोलकर, जनसंपर्क अधिकारी राहुल वंजारे आदी उपस्थित होते. 

*वॉटरप्रूफ मंडप, साउंड, निवास, भोजन व्यवस्था चोख*

यंदाच्या युवा महोत्सवाचे यजमान दलित मित्र कदम गुरुजी सायन्स महाविद्यालयाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. महाविद्यालयाचे अध्यक्ष ऍड. सुजित कदम यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी, परीक्षक, मान्यवर यांच्या भोजन, निवास आदी व्यवस्थेचे चोख नियोजन करण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे मुख्य रंगमंच आणि इतर स्पर्धेसाठी चार ते पाच मोठे रंगमंच संपूर्ण वॉटरप्रूफ मंडप मारून तयार करण्यात आले आहे. कलाप्रकार सादरीकरणासाठी उत्तम साऊंड व्यवस्था ठेवण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थी कलाकारांना कोणतीच अडचण भासणार नसल्याचा विश्वास विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ कळवणे यांनी व्यक्त केला आहे.

SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकिंग : टेम्भुर्णी जवळ पोलिसांच्या गाडीला अपघात ; 6 पोलीस जखमी झाल्याची माहिती

Next Post

खळबळजनक ! भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांना जीवे मारण्याची धमकी ; पोलीस आयुक्तांनी चौकशीचे दिले आदेश | Solapur

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

खळबळजनक ! भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांना जीवे मारण्याची धमकी ; पोलीस आयुक्तांनी चौकशीचे दिले आदेश | Solapur

ताज्या बातम्या

अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

26 June 2026
धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

18 June 2026
धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

12 June 2026
सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026
बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026
आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

3 June 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

2 June 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

Our Visitor

1986193
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group