केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार येऊन आज सात वर्षे पूर्ण झाले आहेत हे सात वर्ष नसून देशाला लागलेली साडेसाती आहे अशी टीका करत सोलापुरात शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने अध्यक्ष प्रकाश वाले नगरसेवक विनोद भोसले यांच्या नेतृत्वाखाली मोदी सरकारच्या धोरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मागील सात वर्षात मोदी सरकारने जीएसटी नोटाबंदी असे जाचक निर्णय घेतले, सध्या इंधन दरवाढ गॅस दरवाढ महागाई बेरोजगारी प्रचंड वाढले आहे, कोरोनासारख्या महामारी मध्ये सुद्धा महाराष्ट्राला लस देण्यात हे सरकार जाणीवपूर्वक आडकाठी घालत आहे या निषेधार्थ हे निदर्शने आंदोलन करण्यात आले.
सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा
सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...















