Thursday, October 8, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर : महेश कोठेंनाच राष्ट्रवादीत सन्मानाची वागणूक आहे का, ते खरटमल यांना कुठून देणार ; या पक्षाची बोचरी टीका

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
12 December 2021
in solapur
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये अधिकृत प्रवेश न केलेले नेते महेश कोठे यांनी 9 डिसेंबर रोजी सुधीर खरटमल यांच्या एका कार्यक्रमात खरटमल यांना काँग्रेसमध्ये जी सन्मानाची वागणूक होती, तोच सन्मान राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये मिळेल असे वक्तव्य केले. या वक्तव्याचा काँग्रेस पक्षाच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी समाचार घेतला आहे. 

मुळात महेश कोठे अजूनही अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये नाहीत, राष्ट्रवादी काँग्रेस मधील चित्र पाहता अजूनही त्यांना जम बसवता आला नाही, त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये किती सन्मान दिला जातोय हे सोलापूरकर काय तर त्यांना स्वतःला पण  माहित मात्र सांगणार कसं, मग ते सुधीर खरटमल यांना काय सन्मान मिळवून देणार? असा सवाल कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी उपस्थित केला .

2014 साली महेश कोठे हे शिवसेनेत गेले मुळात त्यांची पसंती भारतीय जनता पार्टीला होती मात्र शहर उत्तर भाजपचा मतदार संघ, शहर मध्यसाठी नाईलाजाने शिवसेनेला पसंती दिली. 2017 च्या महापालिका निवडणुकीत पक्षाला सत्तेचे स्वप्न दाखवलं, कारभार हातात घेतला, पुरुषोत्तम बरडे, अस्मिता गायकवाड, लक्ष्मीकांत ठोगें-पाटील यांना डावलून तिकीट दिली त्यांनी 21 नगरसेवक निवडून आणले परंतू, 21 पैकी 12 नगरसेवक त्यांच्या नातेवाईकांपैकी आहेत, स्वीकृत नगरसेवक पद सुद्धा आपल्या कार्यकर्त्याला दिले. 

आता सुद्धा त्यानी राजकीय वातावरण बघून राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष निवडला मागील वर्षभरापासून ते शरद पवार यांच्या संपर्कात आहेत तरीही त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रवेश केलेला नाही अजूनही मी शिवसेनेचाच असल्याचं सांगत हातातील शिवबंधन अजून त्यांनी काढलेले नाही यावरून त्यांची राजकीय विश्वासार्हता किती? असाही प्रश्न काँग्रेस नेत्यांनी उपस्थित केला आहे.

सध्या महापालिका प्रभाग रचनेची  तयारी सुरू आहे त्यामध्ये महेश कोठे यांनी प्रभाग रचनेचा संपूर्ण अभ्यास करून आराखडा तयार केला आहे. मात्र या आराखड्याला सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांचा विरोध आहे जे राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत त्यांचाही विरोध असल्याची कुरबुर ऐकण्यास मिळते. याच कुरबुरी वरून सुधीर खरटमल यांनी काही नेत्यांची बैठक घडवून आणली. परंतु त्या बैठकीला शहराध्यक्ष भारत जाधव आणि कार्याध्यक्ष संतोष पवार यांना मात्र बोलावले गेले नाही त्याची नाराजी जाधव आणि पवार यांच्या मनात कायम राहिली असल्याचे बोलले जाते.

नुकतेच आमदार संजयमामा शिंदे यांची दुसऱ्या फळीतील नेत्यांनी भेट घेतली त्यात महेश कोठे यांच्याच तक्रारी कानावर घालण्यात आल्या प्रभाग रचनेमध्ये कुणालाही विश्वासात घेतले जात नसल्याची नाराजी मामांच्या कानावर गेल्याची माहिती समोर आली आहे.

SendShareTweetSend
Previous Post

शरद पवारांचा वाढदिवस, ‘एमआयएम’च्या फारूक शाब्दीनीं मागितले हे ‘गिफ्ट’ ; काय म्हणाले शाब्दी

Next Post

सोलापूर : डोक्यावरच्या ‘देवानं’ही वाचवलं नाही | रस्त्यावरच आयुष्य, रस्त्यावरच संपलं | Special Report

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूर : डोक्यावरच्या 'देवानं'ही वाचवलं नाही | रस्त्यावरच आयुष्य, रस्त्यावरच संपलं | Special Report

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002169
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group