Friday, June 26, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर : झेडपी सीईओ स्वामींची ग्रामस्थांनी का काढली बैलगाडीतून मिरवणूक ; काय प्रकार वाचा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
11 December 2021
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : माझी वसुंधरा अभियानानिमित्त उमरड करमाळा येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एक बैठक माझी वसुंधरासाठी या उपक्रमाचा शुभारंभ सीईओ स्वामी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माझी वसुंधरा अभियान, कोविड लसीकरण जनजागृतीसाठी प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रभात फेरी मध्ये बैलगाडीला जनजागृतीचे बॅनर पोस्टर लावून ही बैलगाडी फिरवण्यात आली. 

ग्रामस्थांच्यावतीने दिलीप स्वामी यांची बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली व ग्रामस्थांच्या आणि शाळेच्या वतीने त्यांचा व मान्यवरांचा पुस्तक आणि गुलाबाचे रोप देऊन स्वागत करण्यात आले. प्रभात फेरी मध्ये उमरड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक व विद्यार्थी सामील होते.

याप्रसंगी सीईओ स्वामी यांनी गाव कारभारी व ग्रामस्थांना कोविड लसीकरण तसेच माझी वसुंधरा अभियानात वृक्ष लागवड व संवर्धनाचे महत्त्व पटवून सांगितले. 

सीईओ स्वामी यांनी सुरू केलेल्या एक पद एक वृक्ष अभियानाअंतर्गत लावलेल्या वृक्षांची पाहणी सीईओ स्वामी यांनी केली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उमरड येथील स्वच्छ शाळा सुंदर शाळा उपक्रमांतर्गत झालेल्या कामांची पाहणी, शाळेतील सायन्स वॉल, संगणक कक्ष, अन्नपूर्णा मंदिर, परसबाग पाणी सुविधा, हॅन्ड वॉश स्टेशन, औषधी वनस्पतींची लागवड, सेल्फी पॉइंट इत्यादी बाबींची पाहणी करून स्वामी यांनी समाधान व्यक्त केले.

गट विकास अधिकारी मनोज राऊत यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या तालुक्यातील पहिल्या  सायन्स वॉलचे उद्घाटन सीईओ स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले.  सायन्स वॉल सारख्या अभिनव उपक्रमांची आज नितांत गरज असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या ज्ञानात अशा उपक्रमांद्वारे भर पडणार आहे. हा उपक्रम राबविल्याबद्दल मी मनोज राऊत यांचे मनस्वी अभिनंदन करतो व जिल्ह्यातील इतर शाळांनी या उपक्रमाचे अनुकरण करावे असे आवाहन करतो असे प्रतिपादन सीईओ स्वामी यांनी यावेळी केले.

शाळेने स्वच्छ शाळा सुंदर शाळा अभियानात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल तसेच गटशिक्षणाधिकारी राजाराम भोंग यांच्या मार्गदर्शनाखाली तंबाखू मुक्त शाळा अभियानात शाळेने जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल सीईओ स्वामींनी शिक्षकांचे व ग्रामस्थांचे अभिनंदन व कौतुक केले.

उमरेड येथील कार्यक्रमानंतर पंचायत समिती करमाळा येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी ईशाधीन शेळकंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत, मनोज राऊत गटविकास अधिकारी करमाळा, राजाराम भोंग गटशिक्षणाधिकारी करमाळा, वामनराव बदे, माजी जि.प सदस्य, राजश्री चोरमुले सरपंच, प्रमोद बदे माजी सरपंच, लालासाहेब पडवळे, डी.जी.बदे संदिप मारकड ग्रा.पं.सदस्य, अंकूश कोठावळे पोलिस पाटील आदी उपस्थित होते.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर : चोरी सोलापुरात, वाहन चोरले औरंगाबादचे मात्र चोर निघाले या जिल्ह्याचे ; 10 किलो चांदी हस्तगत

Next Post

सोलापूर : उमेश पाटलांनी दिल्या शरद पवारांना अशा शुभेच्छा ; ‘काकां’च्या कार्यकर्त्यांची उमेशरावांशी जवळीक

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूर : उमेश पाटलांनी दिल्या शरद पवारांना अशा शुभेच्छा ; 'काकां'च्या कार्यकर्त्यांची उमेशरावांशी जवळीक

ताज्या बातम्या

अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

26 June 2026
धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

18 June 2026
धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

12 June 2026
सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026
बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026
आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

3 June 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

2 June 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

Our Visitor

1986180
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group