सोलापूर : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे सध्या जलजीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागात प्रत्येक घरी नळ ही मोठी योजना आहे. सोलापूर जिल्ह्यात सुमारे 841 कामे असून कोट्यवधीचा निधी उपलब्ध झाला आहे. यावर्षी काही कामांना मंजुरी दिली गेली आहे.
मधल्या काळात कार्यकारी अभियंता दीपक कोळी यांच्या कारभारावर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदारांनी नाराजी व्यक्त केली होती.
मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी हे ट्रेनिंगसाठी 24 दिवस मसुरीला गेले असल्याने त्यांचा अतिरिक्त पदभार सहाय्यक जिल्हाधिकारी मनीषा आव्हाळे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. त्यांनी आपल्या समोर जलजीवन मिशन योजनेच्या कामांवर फोकस केला आहे.
पत्रकारांनी गुरुवारी सकाळी सीईओ आव्हाळे यांची भेट घेतली. विविध विषयांवर चर्चा झाली. जलजीवन मिशन तसेच जिल्हा परिषदेचे बंद असलेले प्रवेशद्वार, पार्किंगची व्यवस्था असे प्रश्न विचारले असता, आव्हाळे म्हणाल्या, येत्या 31 डिसेंम्बर अखेर सर्व कामे मंजूर करायची आहेत. हेच मोठं उद्दिष्ट सध्या जिल्हा परिषदेच्या समोर आहे. माझ्याकडे केवळ 1 महिना पदभार आहे, कोणतेही बेकायदेशीर काम करणार नाही, मी कोणताही पॉलिसी मेकिंग डिसीजन घेणार नाही.


















