Sunday, October 18, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर जिल्हा दूध संघाच्या संचालकपदी सुरेश हसापुरे यांची निवड : हसापुरेंच्या रुपात दक्षिणला न्याय मिळाला

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
10 September 2022
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : काँग्रेस नेते सुरेश हसापुरे यांच्या रूपात दक्षिण सोलापूर तालुक्याला न्याय मिळाला असून सोलापूर जिल्हा दूध सहकारी उत्पादक संघाच्या संचालक पदी त्यांची निवड करण्यात आली आहे.

सोलापूर जिल्हा दूध संघ निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वच नेत्यांनी एकत्र येऊन प्रयत्न केले होते त्यामध्ये सुरेश हसापुरे यांचा रोल अतिशय महत्त्वाचा ठरला होता. जिल्ह्याचे नेते दिलीप सोपल, आमदार बबनदादा शिंदे, आमदार संजयमामा शिंदे, माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार दिलीप माने, माजी आमदार प्रशांत परिचारक,  माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार दीपक साळुंखे, सांगोल्याचे चंद्रकांत देशमुख, मंगळवेढ्याचे बबनराव अवताडे, करमाळ्याच्या रेशमी बागल,काँग्रेस नेते सुरेश हसापुरे या सर्व नेत्यांनी एकत्र येऊन दूध संघाची निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला. 

उमेदवार निश्चित करताना ओबीसी संचालक पदावर राजन पाटील हे आपल्या सर्वाधिक मतांमुळे अडून बसल्याने सुरेश हसापुरे यांना माघार घेण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. नेत्यांच्या मर्जी खातीर हसापुरे यांनी माघार घेतली, तेव्हाच हसापुरे यांना दूध संघावर तज्ञ संचालक म्हणून घेण्याचा शब्द आमदार बबनदादा शिंदे, आमदार संजयमामा शिंदे व माजी आमदार राजन पाटील यांनी दिला होता. राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष काका साठे यांच्या सून उमेदवार असल्याने निवडणूक लागली मात्र नेत्यांची एकजूट असल्याने सर्व जागा मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या. अखेर सहा महिन्यानंतर नेत्यांनी दिलेला शब्द पाळला, हसापुरे यांना दूध संघावर संचालक म्हणून घेण्यात आले आहे. 

सोलापूर जिल्ह्याची विधान परिषद निवडणूक, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक, जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची निवडणूक, सोलापूर बाजार समिती निवडणूक, जिल्हा दूध संघ या निवडणुकीत एक प्रकारे मास्टरमाईंड भूमिका बजावणारे हसापुरे हे मात्र  पदांपासून वंचित होते. शेवटी नेत्यांनी दिलेला शब्द अखेर पाळला त्यांना सोलापूर जिल्हा दूध संघाच्या संचालक पदी निवड करण्यात आली आहे. माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले होते.

दक्षिण सोलापूर तालुक्यात दूध संस्था कमी आहेत. आजपर्यंत यासंस्था वाढीसाठी कुणी प्रयत्न केले नाहीत, यापूर्वी प्रभाकर कोरे हे संचालक होते, मात्र म्हणावा तसा दक्षिण सोलापूर तालुक्यातील दूध संघ वाढीसाठी प्रयत्न झाला नाही. सर्वसामान्य, गोरगरीब, सर्व जाती धर्मामधून लोकप्रिय असणारे हसापुरे यांच्या रूपाने दक्षिण तालुक्याला संचालक मिळाल्याने दूध उत्पादनाच्या क्षेत्रात तालुक्याला मोठी संधी आहे 

 सुरेश हसापुरे यांनी यापूर्वी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक पद, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापतीपद, जिल्हा परिषदेमध्ये सदस्यपद अशा माध्यमातून दक्षिण सोलापूर तालुक्याला न्याय दिला आहे. एका आमदारापेक्षा जास्त निधी आणून तालुक्याच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याचं पाहायला मिळाले. अशा सर्व समावेशक नेत्याच्या रूपात सोलापूर दूध संघाचे संचालक पद आल्याने निश्चितच तालुक्यात धवलक्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. या निवडीबद्दल संपूर्ण दक्षिण सोलापूर तालुक्यासह जिल्हयामधून हसापूरे यांचे अभिनंदन होत आहे. देशाचे नेते सुशीलकुमार शिंदे, काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी हसापुरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरात पोलिसांनी डॉल्बीच्या पिना काढल्या ; आवाजावर आक्षेप, लष्कर मध्यवर्तीने मिरवणूक थांबवली ; नंतर काय घडले

Next Post

दुःखद ! महावितरण कर्मचाऱ्यांचा गणेश विसर्जना दरम्यान विहिरीत बुडून मृत्यू ; 4 वर्षीय मुलगा पोरका झाला

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

दुःखद ! महावितरण कर्मचाऱ्यांचा गणेश विसर्जना दरम्यान विहिरीत बुडून मृत्यू ; 4 वर्षीय मुलगा पोरका झाला

ताज्या बातम्या

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

16 October 2026
ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002646
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group