सोलापूर : काँग्रेस नेते सुरेश हसापुरे यांच्या रूपात दक्षिण सोलापूर तालुक्याला न्याय मिळाला असून सोलापूर जिल्हा दूध सहकारी उत्पादक संघाच्या संचालक पदी त्यांची निवड करण्यात आली आहे.
सोलापूर जिल्हा दूध संघ निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वच नेत्यांनी एकत्र येऊन प्रयत्न केले होते त्यामध्ये सुरेश हसापुरे यांचा रोल अतिशय महत्त्वाचा ठरला होता. जिल्ह्याचे नेते दिलीप सोपल, आमदार बबनदादा शिंदे, आमदार संजयमामा शिंदे, माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार दिलीप माने, माजी आमदार प्रशांत परिचारक, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार दीपक साळुंखे, सांगोल्याचे चंद्रकांत देशमुख, मंगळवेढ्याचे बबनराव अवताडे, करमाळ्याच्या रेशमी बागल,काँग्रेस नेते सुरेश हसापुरे या सर्व नेत्यांनी एकत्र येऊन दूध संघाची निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला.
उमेदवार निश्चित करताना ओबीसी संचालक पदावर राजन पाटील हे आपल्या सर्वाधिक मतांमुळे अडून बसल्याने सुरेश हसापुरे यांना माघार घेण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. नेत्यांच्या मर्जी खातीर हसापुरे यांनी माघार घेतली, तेव्हाच हसापुरे यांना दूध संघावर तज्ञ संचालक म्हणून घेण्याचा शब्द आमदार बबनदादा शिंदे, आमदार संजयमामा शिंदे व माजी आमदार राजन पाटील यांनी दिला होता. राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष काका साठे यांच्या सून उमेदवार असल्याने निवडणूक लागली मात्र नेत्यांची एकजूट असल्याने सर्व जागा मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या. अखेर सहा महिन्यानंतर नेत्यांनी दिलेला शब्द पाळला, हसापुरे यांना दूध संघावर संचालक म्हणून घेण्यात आले आहे.
सोलापूर जिल्ह्याची विधान परिषद निवडणूक, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक, जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची निवडणूक, सोलापूर बाजार समिती निवडणूक, जिल्हा दूध संघ या निवडणुकीत एक प्रकारे मास्टरमाईंड भूमिका बजावणारे हसापुरे हे मात्र पदांपासून वंचित होते. शेवटी नेत्यांनी दिलेला शब्द अखेर पाळला त्यांना सोलापूर जिल्हा दूध संघाच्या संचालक पदी निवड करण्यात आली आहे. माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले होते.
दक्षिण सोलापूर तालुक्यात दूध संस्था कमी आहेत. आजपर्यंत यासंस्था वाढीसाठी कुणी प्रयत्न केले नाहीत, यापूर्वी प्रभाकर कोरे हे संचालक होते, मात्र म्हणावा तसा दक्षिण सोलापूर तालुक्यातील दूध संघ वाढीसाठी प्रयत्न झाला नाही. सर्वसामान्य, गोरगरीब, सर्व जाती धर्मामधून लोकप्रिय असणारे हसापुरे यांच्या रूपाने दक्षिण तालुक्याला संचालक मिळाल्याने दूध उत्पादनाच्या क्षेत्रात तालुक्याला मोठी संधी आहे
सुरेश हसापुरे यांनी यापूर्वी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक पद, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापतीपद, जिल्हा परिषदेमध्ये सदस्यपद अशा माध्यमातून दक्षिण सोलापूर तालुक्याला न्याय दिला आहे. एका आमदारापेक्षा जास्त निधी आणून तालुक्याच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याचं पाहायला मिळाले. अशा सर्व समावेशक नेत्याच्या रूपात सोलापूर दूध संघाचे संचालक पद आल्याने निश्चितच तालुक्यात धवलक्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. या निवडीबद्दल संपूर्ण दक्षिण सोलापूर तालुक्यासह जिल्हयामधून हसापूरे यांचे अभिनंदन होत आहे. देशाचे नेते सुशीलकुमार शिंदे, काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी हसापुरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.






















