Thursday, October 15, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर : जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या विद्यापीठ व सर्व महाविद्यालयांना सक्त सूचनाप

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
21 December 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर :- सोलापूर जिल्ह्याचे लसीकरणाचे उद्दिष्ट 34 लाख 14 हजार चारशे इतके असून आजपर्यंत पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची टक्केवारी 80 तर दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची टक्केवारी 42 आहे. आजपर्यंत सुमारे साडेसहा लाख नागरिकांनी पहिला डोस घेतलेला नाही. त्यातील 18 ते 45 वयोगटातील नागरिकांची संख्या अंदाजे 60 टक्केपर्यंत आहे. त्यामुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या अधिनस्त असलेल्या सर्व महाविद्यालयातील 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचे लसीकरण झाले पाहिजे, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले.

जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या 100% लसीकरणच्या अनुषंगाने आयोजित विद्यापीठातील सर्व संबंधित विभाग प्रमुख व अधिनस्त महाविद्यालयाचे प्राचार्य व मेंटर्सच्या बैठकीत जिल्हाधिकारी शंभरकर मार्गदर्शन करत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार उपस्थित होत्या.

जिल्हाधिकारी शंभरकर पुढे म्हणाले की, 18 ते 45 वयोगटातील नागरिकच मोठ्या प्रमाणावर बाहेर फिरतात. त्यामुळे ते कोरोनाबाधित झाल्यास संपूर्ण कुटुंबाला संसर्ग होण्याची शक्यता असते. हे नागरिक उपचाराने कोरोनामुक्त होतात परंतु घरातील ज्येष्ठ नागरिकांची प्रतिकारशक्ती कमी असल्याने त्यांचा मृत्यू होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे बाहेर फिरणाऱ्या 18 ते 45 वयोगटातील नागरिकांचे 100% लसीकरण होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याअनुषंगाने महाविद्यालयस्तरावरून 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचे लसीकरण झाले पाहिजे, यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य व मेंटर्स यांनी विद्यार्थ्यांचे प्रबोधन करून त्यांचे लसीकरण करून घ्यावे, अशी सूचना त्यांनी दिली.

मागील काही दिवसापासून लसीकरण करून घेण्याच्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे. परंतु जिल्ह्याचे पहिला डोस घेणाऱ्या नागरिकांचे प्रमाण शंभर टक्के झाले पाहिजे, यासाठी सर्व नागरिकांनी स्वतःहून सहकार्य करावे. प्रशासनाने लसीकरणाबाबत योग्य उपाययोजना केल्या असून  जिल्ह्यात जवळपास चारशे ठिकाणी शासकीय स्तरावर लसीकरण केंद्र तर 25 ठिकाणी खाजगी लसीकरण केंद्र सुरू आहेत. तसेच मोबाईल व्हॅन व आरोग्य पथक घरोघरी जाऊन लसीकरण करत असल्याने जिल्ह्यातील सर्व संबंधित नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला लसीकरणासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

लस न घेतलेले नागरिक घराबाहेर फिरु नयेत व त्यांनी स्वतःचे लसीकरण करून घ्यावे यासाठी पेट्रोल पंपावर लसीकरणाचे दुहेरी प्रमाणपत्र असल्याशिवाय पेट्रोल दिले जाणार नाही, असे जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप चालकांनी कळविलेले आहे.  त्याची अंमलबजावणीही सुरू झालेली आहे. कोरोना प्रतिबंधासाठी लसीकरण हाच एक प्रभावी व एकमेव उपाय आहे. त्यामुळे सर्व महाविद्यालयांनी त्यांच्याकडील सर्व विद्यार्थ्यांचे लसीकरण होईल याबाबत विद्यार्थ्यांचे त्यांच्या स्तरावरून प्रबोधन करून त्यांना लसीकरणात समाविष्ट करून घ्यावे, असे जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सूचित केले.

विद्यापीठाच्या वतीने महाविद्यालयातील प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत लसीकरणाबाबत जनजागृती करून लसीकरण न केलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याचे प्रबोधन करण्यासाठी अधिनस्त सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य व विद्यार्थ्यांचे मेंटर हे प्रयत्न करतील व त्यांनी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल आठवड्याच्या प्रत्येक सोमवारी विद्यापीठाला सादर करतील. त्या अनुषंगाने विद्यापीठाच्या वतीने जिल्हा प्रशासनाला लसीकरणाचा अहवाल सादर केला जाईल. सर्व विद्यार्थ्यांचे 100 टक्के लसीकरण करून घेण्यासाठी विद्यापीठाच्या वतीने प्रशासनाला पूर्णपणे सहकार्य करण्यात येईल, असे कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

यावेळी जिल्ह्यातील काही महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर राबवलेल्या लसीकरण मोहिमेची माहिती दिली. यामध्ये श्रीपाद सुरवसे, रविकांत पाटील ,सत्यजित शहा, रफिक नदाफ, बाळासाहेब लिंगे आदीचा समावेश होता.

SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकींग : सोलापूर जिल्हा न्यायालयाचा मोठा निकाल | 20 वर्षाच्या तरुणाला जन्मठेप |

Next Post

ब्रेकींग : बालकांना पोलिओ ऐवजी कावीळची लस ; 7 बालकांना झाला त्रास ; सीईओ स्वामींनी लावली चौकशी

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

ब्रेकींग : बालकांना पोलिओ ऐवजी कावीळची लस ; 7 बालकांना झाला त्रास ; सीईओ स्वामींनी लावली चौकशी

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002453
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group