ग्रामदेवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर यांच्या मंदिरामध्ये काल पासून लाईट नाही एकीकडे पाहायला गेलं तर देवस्थान पंच कमिटीच्या वतीने सुवर्ण सिद्धेश्वर मंदिर चे संकल्पना केलेली आहे मग असं असताना सोलापूरचे ग्रामदेवत सिद्धरामेश्वर यांच्या मंदिरात व गाभाऱ्यात लाईट नाही तर गाभाऱ्यामध्ये तीन टाइम पूजा होत असते त्या ठिकाणी मानकरी हब्बू परिवाराच्यावतीने नित्यनेमाने पूजा होते परंतु कालपासून लाईट नसल्याने बॅटरीच्या साह्याने पूजा करत आहेत यावरून ग्रामदेवत सिद्धरामेश्वर मंदिर देवस्थान पंच कमिटीचे किती दुर्लक्ष आहे यावरून दिसून येते.




















