सोलापूर : नवसाचा गणपती कोनापुरे चाळ गणेशोत्सव मित्र मंडळाच्यावतीने गणेशोत्सवानिमित्त व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त 81 रक्तदात्यानी रक्तदान केले. दि.4 सप्टेंबर रोजी कोनापुरे चाळ गणपती मंदिराजवळ घेण्यात आले होते.
याचे उद्घाटन काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष प्रकाश वाले, माजी नगरसेवक विनोद भोसले व माजी युवक अध्यक्ष अंबादास करगुळे, माजी परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष मारूती करगुळे, उपाध्यक्ष राजेश असादे, खजिनदार सचिन म्हेत्रे, सेक्रेटरी मल्लप्पा दिंनी, अजय मनलोर, सुशीलकुमार म्हेत्रे, मल्लूबाबा म्हेत्रे, अंजन जंगम, अमर हळ्ळी, भगवान करगुळे, रमेश बेरे, उमेश बेरे, अविनाश आसादे, राहुल यमकोठे, अजय अवलुर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.




















