सोलापूर – सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी आरक्षित जागेवर प्रवेश घेवू इच्छिणा-या मागासवर्गीय विदयार्थ्याना जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य असल्याने सर्व विदयार्थ्यांना आवाहन करण्यात येते की, सन 2022-23 या वर्षासाठीच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेण्यास इच्छुक असणा-या ज्या विदयार्थ्यांनी अदयाप जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज दाखल केलेले नाहीत त्यांनी जात वैधता प्रमाणपत्रसाठी ऑनलाईन अर्ज तात्काळ सादर करावे.
शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया सुरु झाल्या असल्याने चालु शैक्षणिक वर्षात वैधता प्रमाणपत्राव मागासवर्गीय विदयार्थी लाभापासून वंचित राहू नये यासाठी ज्या विदयार्थ्यांनी अदयापही जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर केला नाही त्यांनी https://bartievalidity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावा व त्या अर्जाची प्रत आवश्यक त्या कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडून ज्या जिल्हयातून जातीचा दाखला प्राप्त केला आहे त्याच जिल्हयाच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे विलंबाबाबतच्या हमीपत्रासह त्वरित सादर करावी.
जात वैधता प्रमाणपत्राअभावी विदयार्थ्यास आरक्षणातून प्रवेश मिळाला नाही तर त्यास जात प्रमाणपत्र पडताळणी समिती जबाबदार राहणार नाही असे हमीपत्र अर्जदाराने अर्जाच्या प्रतीसोबत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे सादर करणे आवश्यक आहे. हमीपत्राचा नमुना बार्टीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आला आहे. तसेच प्रत्येक जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे सदर हमीपत्राचा नमुना उपलब्ध आहे. असे आवाहन जिल्हा जात पडताळणी सोलापूरच्यावतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.




















