Saturday, May 23, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरात रमजान ईदचा सर्वत्र उत्साह ; मुस्लिम युवकांनों, भडकू नका…आपण उत्तर देणार आहे पण ते…….

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
3 May 2022
in solapur
0
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर :  महिनाभर रोजे करून सश्रध्द भावनेने अल्लाहची इबादत केल्यानंतर मंगळवारी सोलापूर शहर व परिसरात मुस्लिम बांधवांनी ईद-उल-फित्र ( रमजान ईद) उत्साही, आनंदी आणि मंगलमय वातावरणात साजरी होत आहे. सकाळी नमाज पठणानंतर हिंदू मुस्लिम बांधवांनी एकमेकांवर शुभेच्छांचा वर्षाव केला. दिवसभर घरोघरी शिरखुम्यार्चा आस्वाद घेत सर्वांनी ईदचा आनंद लुटण्यास सुरूवात केली आहे. सकाळी शहरातील होटगी रोड वरील प्रमुख ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज अदा करण्यात आली.

गेले महिनाभर रमजानचे रोजे करून मुस्लिम कुटुंबीयांनी अल्लाह व त्यांचे प्रेषित मोहम्मद पैगंबरांविषयी श्रध्दा प्रकट केली. कोरोना महामारीमुळे सलग दोन वर्षे सार्वजनिक स्वरूपात रमजान ईद साजरी झाली नाही, यंदा मात्र सर्व निर्बंध उठवले असल्याने सर्वत्र ईदचा उत्साह दिसून आला, बाजारपेठा फुलल्या होत्या,  

काल सोमवारी सायंकाळी चंद्रदर्शन होताच ईद का चाँद मुबारक म्हणून एकमेकांना शुभेच्छा व्यक्त करून शहर काझी मुफ्ती अमजद अली काझी यांनी मंगळवारी रमजाई ईद साजरी करण्यात येईल असे सांगितले होते. मंगळवारी ईदच्या दिवशी सकाळी सर्व मशिदी व ईदगाह मैदानांवर मुस्लिम बांधव नवीन कपडे परिधान करून व अत्तर लावून प्रसन्न चित्ताने नमाजासाठी एकत्र आले होते  आलमगीर ईदगाह (होटगी रोड) या ऐतिहासिक शाही ईदगाहवर सकाळी 9 वाजता सामूहिक नमाज व प्रार्थना करण्यात आली.

देशात व जगात सुख व शांती नांदू दे, बेरोजगारांना रोजगार मिळू दे, आजारी व संकटात सापडलेल्यांची पीडा टळू दे, सवार्ना खऱ्या अर्थाने धर्माने सांगितलेल्या मार्गावरून चालण्याची सद्बुध्दी मिळू दे अशी प्रार्थना करण्यात आली. 

दरम्यान उपस्थित हजारो मुस्लिम बांधवांना संबोधित करताना शहर काझी मुफ्ती अमजद अली काझी यांनी, मुस्लिम समाजातील शिक्षणाच्या टक्केवारी वरून तीव्र अशी नाराजी व्यक्त केली. मुस्लिम समाजातील केवळ 42 टक्के मुलं शिक्षण घेतात, 58 टक्के मुले ही शाळा आणि महाविद्यालयाला जात नाहीत. त्यामध्ये 6.55 टक्के विद्यार्थी दहावी पास आहेत, त्यात केवळ 4.44 टक्के विद्यार्थी बारावीचे शिक्षण घेतात. मुस्लिम समाजात पदव्युत्तर शिक्षणाचा टक्का 2.76 टक्के आहे आणि पदवीतर नंतर शिक्षण घेतलेल्याचे प्रमाण केवळ 0.44 टक्के येते. मुस्लिम समाजात  शिक्षणाचा एवढा उतरता टक्का का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

देशाच्या लोकसंख्येत 14.2 टक्के मुस्लिम समाज आहे त्यामध्ये 6.2 टक्के पोलीस प्रशासनात आहेत, भारतीय सैन्यामध्ये प्रमाण 3 टक्के आहे, भारतीय प्रशासकीय आणि पोलीस सेवेमध्ये 3.4 टक्के मुसलमान आहेत, मुंबई उच्च न्यायालयातील 57 न्यायाधिशांमध्ये केवळ दोन न्यायाधीश मुसलमान आहेत, सर्वोच्च न्यायालयामध्ये 34 न्यायाधीशांमध्ये केवळ एक न्यायाधीश मुस्लिम समाजाचा आहे ही आकडेवारी पाहता प्रचंड त्रास होतो, हा त्रास कोणासमोर व्यक्त करावा.

आज मुस्लिम समाजाला बदनाम करण्याचे षड्यंत्र सुरू आहे. कोणत्याही पक्षाचे नाव न घेता शहर काझी यांनी विरोधी पक्षांकडून मुस्लिम समाजाला भडकवण्याचे काम सुरू असल्याचा आरोप करत आम्हाला किती भडकवता, आम्ही याचे उत्तर देणार परंतु ते दगडाने नाही तर शिक्षण, पेन आणि पुस्तकांने. मुस्लिम युवकांनों भडकू नका, आम्ही तुमच्या जाळ्यात फसणारे नाही म्हणून सांगा, कारण आम्हाला महाराष्ट्र सरकारवर विश्वास आहे, हे सरकार या परिस्थितीला तोंड देण्यात सक्षम असल्याचा दावा शहर काझी यांनी केला.

SendShareTweetSend
Previous Post

मोठी बातमी ! पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांचा निर्णय ; पोस्ट आणि खाजगी कुरिअरच्या गोडावूनची तपासणी करणार डॉग स्क्वॉड

Next Post

ब्रेकिंग : मनसे नेते दिलीप धोत्रे नजरकैदेत ; मनसे पदाधिकाऱ्यांना पोलिसांच्या नोटिसा

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

ब्रेकिंग : मनसे नेते दिलीप धोत्रे नजरकैदेत ; मनसे पदाधिकाऱ्यांना पोलिसांच्या नोटिसा

ताज्या बातम्या

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

21 May 2026
सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

12 May 2026
अभिनंदन ! अरुण क्षीरसागर  यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

अभिनंदन ! अरुण क्षीरसागर यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

12 May 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

6 May 2026
सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026

क्राईम

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1980547
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group