सोलापूर : पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी पंतप्रधान मोदींविरोधात केलेल्या वक्तव्याविरोधात भाजप सोलापूर शहराच्या वतीने भाजप कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त करून पाकिस्तानसोबत बिलावलचा पुतळा जाळण्यात आला. याप्रसंगी बोलताना आमदार सुभाष देशमुख म्हणाले, पाकिस्तानची ढासळती अर्थव्यवस्था, अराजकता, लष्करातील मतभेद आणि बिघडत चाललेले जागतिक संबंध यापासून जगाला वळवणे आणि दिशाभूल करणे हे या वक्तव्याचे उद्दिष्ट आहे.
विभागीय संघटन मंत्री मकरंद देशपांडे म्हणाले, रशिया-युक्रेन संघर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने पाकिस्तानी विद्यार्थ्यांना कसे वाचवले हे जगाने पाहिले आहे, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने जागतिक व्यासपीठावर आपली अमिट छाप सोडली आहे, पण दुसरीकडे पाकिस्तानची थट्टा आणि अपमान सहन करावा लागत आहे. बिलावल यांनी ज्या प्रकारची भाषा वापरली आहे ती निषेधार्ह आहे.
यावेळी संघटन सरचिटणीस रुद्रेश बोरामणी, सरचिटणीस शशी थोरात, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, जय साळुंके, रामचंद्र जन्नू , पांडुरंग दिड्डी, प्रशांत फत्तेपूरकर, भूपती कमटम, दीनानाथ धुळम, चंद्रकांत तापडिया, विजया वड्डेपल्ली, रेखा गायकवाड, नागेश सरगम, अनिल कंदलगी, श्रीनिवास जोगी, रुचिरा मासम, डॉ शिवराज सरतापे, बसवराज केंगनाळकर, गणेश पेनगोंडा, बाबुराव संगेपान, जयंत होले पाटील, दत्ता पाटील, रवी भवानी, सिद्धेश्वर मुनाळे, शिवशरण बब्बे, महेश देवकर, मधुकर वडनाल, बिपीन धुम्मा, नागेश गंजी, विजय इप्पाकायल, सतीश भरमशेट्टी, डॉ अंबादास लोकुर्ती, प्रकाश म्हंता, सुकुमार सिद्धम, लिंगराज जवळकोटे, अविनाश बोंमड्याल, रामेश्वरी बिर्रू, राधिका पोसा, विमल पुठ्ठा, अर्चना वडनाल, गणेश साखरे, प्रेम भोगडे, श्रीपाद घोडके, बिपिन धुम्मा, नरेश पतंगे, मल्लिनाथ कुंभार, गिरीश बत्तुल, भीमाशंकर बिराजदार, दत्तू पोसा, सतीश महाले, अक्षय अंजीखाने आदीसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.



















