Saturday, June 27, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरात अनोख्या पद्धतीने साजरा झाला “ग्राहक दिन” ; ग्राहकांचे हित, संरक्षण व हक्काचा जागर

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
25 December 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर :- प्रति वर्षी 24 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. ग्राहक संरक्षण कायद्यामुळे सर्व ग्राहकांना सुरक्षेचा अधिकार, उत्पादनाबाबत च्या माहितीचा अधिकार, उत्पादन निवडीचा अधिकार व तक्रार निरसन करून घेण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे. या कायद्यामुळे ग्राहकांना मिळालेले अधिकार हे ग्राहकाची फसवणूक होऊ नये म्हणून अत्यंत महत्त्वाचे आहेत. तरी या अधिकाराबाबत ग्राहक म्हणून प्रत्येक नागरिकांनी अधिक जागरूक राहिले पाहिजे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी केले.

शिवछत्रपती रंगभवन येथे राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार बोलत होत्या. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षा लांडगे, साहयक जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक साळुंखे, अखिल भारतीय ग्राहक पंचायत सदस्य भालचंद्र पाठक, दिपक इरकल, हरिदास,  महाराष्ट्र राज्य ग्राहक पंचायत  परिषदेच्या सदस्या शोभना सागर, ॲड. आनंद सागर, भैरवनाथ कानडे तसचे अन्य मान्यवर उपस्थित होते.

निवासी उपजिल्हाधिकारी पवार पुढे म्हणाल्या की, आजचा हा राष्ट्रीय ग्राहक दिन हा ग्राहक शक्तीची ग्राहक हिताची जाणीव करून देणारा आहे. या कायद्याच्या संरक्षणामुळे ग्राहक हिताची जोपासना होण्यास मदत मिळत आहे. शहरी व ग्रामीण भागातील प्रत्येक ग्राहकापर्यंत या कायद्याबाबत जनजागृती होऊन प्रत्येक नागरिक आपल्या हक्कासाठी व आपली फसवणूक होऊ नये यासाठी जागरूक राहिला पाहिजे यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा असे आवाहन त्यांनी केले.

ग्राहक पंचायत सदस्य महाराष्ट्र राज्याच्या सदस्या श्रीमती सागर यांनीही राष्ट्रीय ग्राहक दिनाचे महत्त्व सांगून प्रत्येक नागरिकांनी आपल्या हक्काबाबत सजग राहिले पाहिजे व ग्राहक हक्काची माहिती इतरांना पर्यंतही पोहोचवली पाहिजे. ग्राहकांची फसवणूक झाल्यास संबंधित ग्राहकाने तात्काळ तक्रार निवारण मंचाकडे तक्रार दाखल कराव्यात, असे त्यांनी सांगितले.

शाहीर खाडे यांनी पथनाट्य व पोवाड्यातून ग्राहक संरक्षण परिषद व राष्ट्रीय ग्राहक दिनाचे महत्त्व उपस्थित नागरिकांना पटवून दिले.

प्रारंभी निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांच्या हस्ते  राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ग्राहक शक्तीची व ग्राहक हिताची जाणीव करून देणार्‍या विविध शासकीय विभागाच्या प्रबोधनात्मक माहिती स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले.

राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या अनुषंगाने ग्राहक संरक्षण कायद्याची ग्राहकांमध्ये जनजागृती साठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षा लांडगे यांनी प्रास्ताविकात दिली. तसेच ग्राहक दिन आयोजित करण्याचा उद्देश ही त्यांनी सांगितला. तरी या कार्यक्रमास उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार सहाय्यक पुरवठा अधिकारी विवेक साळुंखे यांनी मानले.सूत्रसंचालन प्रसाद सोनवणे यांनी केले.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर जिल्ह्यातील बचत गट समुहाच्या महिलांसाठी झेडपीचा मोठा निर्णय | काय म्हणाले सीईओ दिलीप स्वामी…..

Next Post

सोलापूर | ‘डीएसओ’ वर्षा लांडगे यांनी गॅस सिलेंडर स्फोटाचा अहवाल मागविला ; एलपीजी सिलेंडरमुळे अपघात झाल्यास मिळते इतक्या लाखाची भरपाई

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूर | 'डीएसओ' वर्षा लांडगे यांनी गॅस सिलेंडर स्फोटाचा अहवाल मागविला ; एलपीजी सिलेंडरमुळे अपघात झाल्यास मिळते इतक्या लाखाची भरपाई

ताज्या बातम्या

अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

26 June 2026
धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

18 June 2026
धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

12 June 2026
सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026
बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026
आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

3 June 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

2 June 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

Our Visitor

1986207
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group