सोलापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेतून सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुखपदी प्रा शिवाजी सावंत यांची नियुक्ती झाली आहे. त्यांचे अध्यक्षतेखाली पहिलीच बैठक सोलापुरातील शासकीय विश्रामगृहात गुरुवारी पार पडली.
दरम्यान पत्रकारांशी बोलताना नूतन संपर्कप्रमुख शिवाजी सावंत म्हणाले, संपर्कप्रमुख झाल्यानंतर ही पहिलीच बैठक आहे. यामध्ये फादर बॉडी, युवासेना, महिला आघाडी या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक असून “हिंदू गर्व गर्जना” ही मोहीम शहर व जिल्ह्यात राबविण्याबाबत चर्चा झाली आहे. येणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी “हिंदू गर्व गर्जना” या मोहिमेअंतर्गत मोठ्या प्रमाणात शिवसैनिक मुंबईला जाण्याचे नियोजन करणार आहोत. सुमारे 25000 शिवसैनिक सोलापुरातून दसरा मेळाव्याला मुंबईला जातील असा दावा संपर्कप्रमुख सावंत यांनी केला.



















