Sunday, October 11, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सेनेच्या जीवावर वाढलेली भाजपा “गद्दार” निघाली ; म्हेत्रेंचे बलिदान वाया जाणार नाही

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
21 July 2021
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – हिंदुत्वासाठी बलिदान देणाऱ्या म्हेत्रे कुटुंबाबद्दल शिवसेनेला कायमच आदर आहे. ठाकरे कुटुंबातील सदस्य त्यांच्या घरी येऊन गेले, याचा अर्थच संकट काळात खंबीरपणे पाठीशी राहणारं नेतृत्व आम्हाला लाभलेलं आहे असं वक्तव्य शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी केलं. भर पावसात शिवसंपर्क अभियाना करिता जमलेल्या प्रभाग क्र २० मधील शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. उपजिल्हाप्रमुख भीमाशंकर म्हेत्रे यांनी आयोजित केलेल्या या बैठकीस शिवसेना शहरप्रमुख गुरुशांत  धुत्तरगांवकर, महापालिकेतील विरोधी पक्षनेता अमोल  शिंदे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, नगरसेवक भारत बडुरवाले, उपजिल्हाप्रमुख संतोष पाटील, उपशहरप्रमुख रविकांत कांबळे, सिद्धाराम कोरे, रोहित तडवळकर, विजय पुकाळे, रविकांत गायकवाड, अनिल गायकवाड व राज पांढरे आदींसह परिसरातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. 

पुढे बोलताना बरडे  म्हणाले, शिवसंपर्क अभियानाला शहरभर मिळणारा प्रतिसाद बघता, हे अभियान आणखी काही महिने घ्यावे लागेल असे वाटते. सध्या आपण प्रभागात एखाद-दुसरी बैठक घेतोय. परंतु बैठकांना शिवसैनिकांचा मिळणारा प्रतिसाद बघता आपल्याला प्रत्येक प्रभागात किमान पाच-दहा बैठका घ्याव्या लागतील. संघटना वाढीसाठी प्रत्येक शिवसैनिकांनी आणि पदाधिकार्‍यांनी प्रयत्न करावा असे आवाहनही त्यांनी केले.

शहरप्रमुख गुरुशांत धुत्तरगांवकर म्हणाले की, भीमाशंकर म्हेत्रे यांनी या भागात तीन वेळा नेतृत्व केलेलं आहे. संपूर्ण सोलापूर शहरातच एक आदर्श नगरसेवक म्हणून त्यांनी आपल्या कार्याची छाप पाडली होती. संपूर्ण हद्दवाढचं नेतृत्व करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. नव्या रक्ताच्या शिवसैनिकांना सोबत घेत त्यांनी जास्तीतजास्त शिवसैनिक निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत.

अमोल  शिंदे यांनी पालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या अपयशावर ताशेरे ओढले आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची कार्यपद्धती सर्वसामान्य लोकांना भावणारी असल्याचे सांगितले.

उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण यांनी म्हेत्रेंच्या बलिदानाची आठवण सांगतानाच जो शिवसैनिकांना नडतो तो संपतो असं म्हटलं. शिवसेनेच्या शाखा वाढविल्या पाहिजेत व जास्तीतजास्त सदस्य नोंदणी करुन घेतली जावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केले.नगरसेवक भारत बडुरवाले म्हणाले, सेनेच्या जीवावर वाढलेली भाजपा गद्दार निघाली. पालिकेतला कारभारही अतिशय गलिच्छ आहे. विशेषतः या भागातील लोधी समाज सर्व ताकदीनिशी शिवसेनेच्या पाठीशी राहील अशी ग्वाहीही त्यांनी दिली. 

यावेळी प्रातिनिधीक स्वरुपात ईरण्णा मसुती व लक्ष्मण पाटील यांनी शिवसेना सदस्यत्वाचे फॉर्म भरले. बैठकीच्या यशस्वीतेकरिता गुरुसिद्ध म्हेत्रे, काशिनाथ म्हेत्रे, अनिल कुंभार, उमाकांत म्हेत्रे, शरणप्पा जवळगीकर, सुरेश म्हेत्रे व नागेश म्हेत्रे यांनी परिश्रम घेतले.

सूत्रसंचालन संतोष घोडके यांनी केलं, तर आभार संतोष पाटील यांनी मानले.

SendShareTweetSend
Previous Post

NCP ! माळशिरस तालुका युवक अध्यक्षाचा राजीनामा ; पत्रात हा केला खुलासा

Next Post

राज कुंद्रा चांगलाच अडचणीत ; मुंबईच्या कार्यालयावर छापे, सर्व्हर जप्त, व्यवसाय भागीदाराविरूद्ध लुकआउट नोटीस

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

राज कुंद्रा चांगलाच अडचणीत ; मुंबईच्या कार्यालयावर छापे, सर्व्हर जप्त, व्यवसाय भागीदाराविरूद्ध लुकआउट नोटीस

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002326
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group