सोलापूर : देहूतल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांना बोलू न देणे हा महाराष्ट्राचा अपमान आहे, अशी खंत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली. दरम्यान या विषयावर माजी मंत्री सदाभाऊ खोत यांची प्रतिक्रिया घेतली असता हा कुठला महाराष्ट्राचा अपमान आहे, अजितदादा पवार व देवेंद्र फडणवीस हे जेव्हा दोघे एकत्र असतात तेव्हा मुख्यमंत्री हे सुप्रिया ताई कशा विसरल्या त्यामुळे अजित पवारांनी प्रोटोकॉल पूर्ण केला या शब्दात सदाभाऊ खोत यांनी सुप्रियाताईंची फिरकी घेतली..