Tuesday, June 23, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सासरा विधान परिषद अध्यक्ष तर जावई विधानसभा अध्यक्षपदी ; असाही राजकीय योगायोग

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
3 July 2022
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई  :  विधानभवनात विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी मतदान झाले. यात भाजपच्या राहुल नार्वेकर यांनी बाजी मारली आहे. त्यांना 164 आमदारांची मतं मिळाली. नार्वेकर यांनी बहुमताचा आकडा पार केला आहे. विधानसभेत मोठ्या गदारोळात मतदान पार पडलं. भाजपकडून राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे राजन साळवी मैदानात होते.

चंद्रकांत पाटील यांनी राहुल नार्वेकर यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला होता. राहुल नार्वेकर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली आहे. राहुल नार्वेकर यांनी बहुमताचा आकडा पार केला आहे. राहुल नार्वेकर यांनी 164 मतं मिळाली आहेत. त्यानंतर उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. दरम्यान, महाविकास आघाडीच्या राजन साळवींना 107 मतं मिळाली.  निवड होताच भाजपकडून जय श्री रामाच्या घोषणा दिल्या.  बंडखोर आमदारांकडून जय भवानी, जय शिवाजी..भारत माता की जय..अशा घोषणा देण्यात आल्या.

राज्याच्या इतिहासातील सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष ठरले आहेत. शिरगणती केल्यानंतर नार्वेकर यांना बहुमतापेक्षा जास्त 164 मत मिळाली. या राजकीय गदारोळात अध्यक्षांची भूमिका आता महत्वाची असणार आहे. कारण उद्या शिंदे-फडणवीस सरकारची बहुमत चाचणी देखील पार पडणार आहे.

राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदी निवड करावी असा प्रस्ताव चंद्रकांत पाटील यांनी मांडला त्याला गिरीश महाजन यांनी अनुमोदन दिलं. तर चेतन तुपे यांनी साळवी यांचा प्रस्ताव मांडला, तर संग्राम थोपटे यांनी अनुमोदन दिलं. नव्याने स्थापन झालेल्या शिंदे सरकारला बहुमत चाचणीला सामोरं जावे लागणार आहे. विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अध्यक्षांची निवड झाली आहे. 

शिंदे सरकारकडून विधानसभा अध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं होतं तर महाविकास आघाडीकडून शेवटच्या क्षणाला राजन साळवी यांना मैदानात उतरवलं होतं. एकनाथ शिंदे गट आणि भाजपचं संख्याबळ पाहता राहुल नार्वेकर हेच विधानसभा अध्यक्ष होतील हे जवळपास निश्चित होतं.

२०१४ मध्ये शिवसेनेकडून राहुल नार्वेकर यांना लोकसभेची उमेदवारी नाकारण्यात आली होती. त्यामुळे राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत २०१४ मध्येच अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. २०१४ मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मावळ लोकसभेतून निवडणूक लढवली. ते ३ वर्ष राष्ट्रवादीचे विधान परिषद सदस्य देखील राहिले आहेत.

राहुल नार्वेकर पुढे या पक्षात थांबले नाही तर, ‘ज्याचे ‘पारडे’ जड तिथे राहुल नार्वेकर’ असे म्हणत त्यांनी भाजपचा मार्ग स्वीकारला. एकंदरीतच शिवसेनेकडून उमेदवारी न मिळाल्याने राहुल नार्वेकर यांनी सुद्धा शिवसेनेसोबत गद्दारी केली. 

आता विधानसभेच्या अध्यक्ष पदासाठी माजी शिवसैनिक राहुल नार्वेकर आणि एकनिष्ठ शिवसैनिक राजन साळवी यांच्यात थेट लढत झाली. यात त्यांचा विजय झाला.

SendShareTweetSend
Previous Post

शेगावच्या गजानना तव दर्शनास आलो…,श्री गजानन महाराज की जय ; भक्तिभावाने प्रशासनाने केले स्वागत

Next Post

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी का दिली NHAI च्या अधिकाऱ्यांना शाबासकीची थाप

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी का दिली NHAI च्या अधिकाऱ्यांना शाबासकीची थाप

ताज्या बातम्या

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

18 June 2026
धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

12 June 2026
सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026
बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026
आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

3 June 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

2 June 2026
सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

31 May 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

Our Visitor

1985921
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group