Thursday, October 15, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सर्वपक्षीय नेत्यांच्या हजेरीत रंगला पत्रकार नारायण चव्हाण यांचा सेवानिवृत्ती सत्कार सोहळा ; डॉ लहाने यांच्या उपस्थितीने सोहळ्याला ‘चार चांद’

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
9 November 2022
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर,दि.७ : आजची नवीन पिढी मोबाईलच्या मागे लागली असून त्याच्या अतिवापराने डोळ्यांचे मायनस नंबर वाढत आहेत.लहान मुलांमध्ये तिरळेपणाचा आजार जडत असून मोबाईलचा अतिरेक टाळून 

त्याचा गरजे इतकाच वापर करावा,असा मौलिक सल्ला जागतिक नेत्ररोगतज्ञ पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने यांनी दिला आहे.रविवारी, डॉ.निर्मलकुमार फडकुले सभागृहात कुमठे प्रशालेतील शिक्षक तथा जेष्ठ पत्रकार नारायण चव्हाण यांचा सेवानिवृत्ती निमित्त गौरव समितीच्यावतीने आयोजित सत्कार सोहळ्यात डॉ. लहाने बोलत होते.

अध्यक्षस्थानी आमदार सुभाष देशमुख होते. डॉ. लहाने यांच्या हस्ते नारायण चव्हाण व त्यांच्या पत्नी अनिता चव्हाण यांचा शाल श्रीफळ पुष्पहार पुष्पगुच्छ आणि विठ्ठल मूर्ती देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी मंचावर आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, सिद्धेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष पुष्कराज काडादी, ज्येष्ठ विधीज्ञ धनंजय माने, जय हिंद शुगरचे अध्यक्ष गणेश माने देशमुख, जकराया साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक सचिन जाधव, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके, मंद्रूपचे तहसीलदार राजशेखर लिंबारे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील, माजी नगरसेवक शिवा बाटलीवाला आदींची उपस्थिती होती.

प्रारंभी विद्यार्थिनी श्रद्धा लंगोटे हिने स्वागत गीत सादर केले. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे आणि डॉ. शिवरत्न शेटे यांचा संदेश यावेळी ऐकवण्यात आला.पुढे बोलताना डॉ. लहाने म्हणाले, मोबाईल वापरामुळे पुस्तक संस्कृती संपत चालली असून गुगलवर अवलंबून राहण्यामुळे बुद्धिमत्तेचा कस कमी होत आहे.त्यामुळे वाचन चळवळ वाढविले पाहिजे. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांनी गरिबांची काळजी घ्यावी असे सांगून त्यांनी आरोग्याच्या काही मौलिक सूचना केल्या तसेच त्यांनी आपल्या मनोगतात चव्हाण यांच्या कार्याचे कौतुक करीत पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक सेवेचा वसा पुढे चालू ठेवावा,असे सांगितले. सत्काराला उत्तर देताना चव्हाण म्हणाले,

माजी आमदार ब्रह्मदेव माने, डॉ.तात्याराव लहाने आणि पत्रकारिता यातून आपल्या जीवनाला कलाटणी मिळाली.शिक्षक म्हणून काम करताना पत्रमहर्षी रंगाआण्णा वैद्य यांनी पत्रकारितेची संधी दिली. त्यामुळे शैक्षणिक व पत्रकारितेच्या माध्यमातून समाजसेवा करता आली.यावेळी आमदार देशमुख,कल्याणशेट्टी, माजी मंत्री म्हेत्रे,धनंजय माने, तहसीलदार लिंबारे, प्रा. डॉ.भीमाशंकर बिराजदार,शेळके आदींनी मनोगत व्यक्त केले.गौरव समितीचे दत्ता थोरे यांनी प्रास्ताविक केले.प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा. डॉ. किशोर थोरे यांनी आभार मानले.यावेळी सोलापुरातील विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरात अब्दुल सत्तारांच्या प्रतिमेला जोडे मारून फोटोचे दहन ; पन्नास खोके खाऊन माजलेत बोके…..

Next Post

सोलापूरच्या लोकप्रतिनिधींनो, आई-वडिलांचा तळतळाट घेऊ नका ; आता तरी जागे व्हा…दशरथ गोप यांचा टाहो

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूरच्या लोकप्रतिनिधींनो, आई-वडिलांचा तळतळाट घेऊ नका ; आता तरी जागे व्हा...दशरथ गोप यांचा टाहो

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002468
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group