Wednesday, May 6, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

शेतकरी महिलेच्या परवानगी विना मुरूम चोरला | पंढरपूरच्या मोठ्या कंपनीवर गुन्हा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
31 December 2021
in solapur
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगोला : रस्त्याची कामे करणार्‍या पंढरपूर येथील ठेकेदाराने शेतकरी महिलेच्या संमतीविना एक एकर क्षेत्रात उत्खनन करून मुरूम चोरी केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. मात्र, मुरूम चोरीची तक्रार दाखल करून घेण्यास पोलीस ठाण्यात टाळाटाळ करण्यात आली होती. संबंधित शेतकरी महिलेने याबाबत कोर्टात धाव घेतली. अखेर मुरूम चोरी प्रकरणी पंढरपूर येथील सी.पी.बागल अँड कंपनीच्या चंद्रकांत प्रभाकर बागल व पद्माकर प्रभाकर बागल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा हुकूम न्यायालयाने सांगोला पोलीस निरीक्षक यांना दिला आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी, फिर्यादी सरिता दादासो सावंत रा.कडलास रोड, सांगोला यांची हंगिरगे ता. सांगोला येथे शेतजमीन आहे. फिर्यादीच्या जमीनीपासून जवळच हंगीरंगे ते टोकलेवस्ती या रस्त्याचे प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमार्फत मुरुमीकरण व खडीकरण करण्यात आले आहे. सदर रस्त्याचा ठेका सी.पी. बागल अँड कंपनी रा. गादेगाव ता. पंढरपूर यांना मिळाला होता. या रस्त्याच्या कामासाठी सी.पी.बागल अँड कंपनीच्या चंद्रकांत प्रभाकर बागल व पद्माकर प्रभाकर बागल यांनी फिर्यादी सरिता दादासो सावंत यांची संमती न घेता त्यांच्या एक एकर क्षेत्रातील सुमारे ते साडेतीन फूट खोदकाम करून जागोजागी खड्डे पाडून मुरूम रस्त्याच्या कामासाठी वापरला. त्यानंतर सावंत यांनी हंगिरगे ग्रामपंचायत कार्यालयात चौकशी केली असता त्यांच्या जमीनीतील मुरूम सी.पी.बागल अँड कंपनीने हंगीरगे ते टोकलेवस्ती रस्त्याच्या कामासाठी वापरला असल्याची माहीती मिळाली.

सरिता सावंत या सांगोला पोलीस स्टेशनमध्ये मुरूम चोरीची तक्रार देण्यास गेल्या असता पोलीसांनी त्यांची तक्रार घेण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर सावंत यांनी सांगोला पोलीस स्टेशनला रजिस्टर पोष्टाने लेखी तकार पाठविली व त्या तक्रारीची प्रत रजिस्टर पोष्टाने जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, मंगळवेढा उपविभागीय पोलीस अधिकारी, मंगळवेढा उपविभागीय अधिकारी यांना पाठविल्या. त्यानंतर जवळा मंडल अधिकारी यांच्या अहवालानुसार चौकशी करून सांगोला तहसीलदार यांनी सी.पी.बागल कंपनीला नोटीस पाठविली होती. मात्र, राजकीय पुढार्‍यांच्या दबावामुळे पोलिसांनी संबंधित ठेकेदारांवर कारवाई केली नाही. त्यामुळे सरिता सावंत यांनी अखेर कोर्टात धाव घेतली होती. चंद्रकांत बागल व पद्माकर बागल यांनी फिर्यादीच्या मालकीच्या मिळकतीतील मुरूम चोरून नेला आहे. सदर मुरूम खोदकामासाठी शासनाची कोणतीही परवनगी घेतली नाही. तसेच बेकायदा मुरूम उत्खनन करून पर्यावरणाचे नुकसान केले आहे. 

मुरुमाची चोरी करण्यासाठी त्यांच्या कंपनीच्या वाहनांचा वापर केला आहे. चोरून नेलेला मुरूम इतर कोणत्या ठिकाणी वापरला आहे किंवा कसे? तसेच मुरूम चोरून नेलेल्या जागेचा सविस्तर पंचनामा होणे आवश्यक असल्याने मुरूम चोरीच्या गुन्ह्याचा तपास होवून आरोपीविरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्यासाठी न्यायालयाने पोलीस निरीक्षक सांगोला यांना गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर मुरूम चोरीप्रकरणी पंढरपूर येथील सी.पी.बागल अँड कंपनीच्या चंद्रकांत प्रभाकर बागल व पद्माकर प्रभाकर बागल यांच्याविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले करीत आहेत.

SendShareTweetSend
Previous Post

चोरी केली आणि घरही पेटवले | पंढरपूर तालुक्यातील या गावातील प्रकार

Next Post

दिलीप मानेंच्या नेतृत्वात पुढील राजकारण | सभापती ‘अविश्वास’ ही स्टंटबाजी होती | त्यांच्यावर आमचे नेते ‘भारी’ पडले

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

दिलीप मानेंच्या नेतृत्वात पुढील राजकारण | सभापती 'अविश्वास' ही स्टंटबाजी होती | त्यांच्यावर आमचे नेते 'भारी' पडले

ताज्या बातम्या

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026
सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

14 April 2026

क्राईम

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1979120
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group