Tuesday, October 20, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

वैष्णवांचा मेळा दाखल झाला माझ्या सोलापुरी ; संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात भक्तिभावे स्वागत

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
4 July 2022
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter











चालतो रे तुझी वाट रात्रंदिनी
घेतला पावलांनी वसा
टाळ घोषातुनी साद येते तुझी
दावते वैष्णवांना दिशा
सोलापूर : ‘ध्यास हा जिवाला पंढरीशी जाऊ। पंढरीचा राणा डोळे भरून पाहू’ असे म्हणत आषाढी एकादशीसाठी पंढरपूरला निघालेल्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सोमवार ४ जुलै रोजी दुपारी ११ वाजून ४५ मिनिटांनी सोलापूर जिल्ह्यात कारुंडे येथे आगमन झाले. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर  यांनी माऊलींच्या पादुकांचे पूजन करून स्वागत केले. यंदा चार पदरी रस्त्याचे काम सुरू असल्याने धर्मपुरी येथे जागा नसल्याने कारुंडे येथे पालखीचे स्वागत झाले. प्रारंभी माऊलीच्या अश्वाची पूजा प्रशासनाच्या वतीने करण्यात आली. 





संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी स्वागत समारंभाला  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, प्रांताधिकारी अप्पासाहेब समिंदर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ शितल जाधव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ प्रदीप ढेले, mseb चे अधिक्षक अभियंता सांगळे, पोलीस उपअधीक्षक बसवराज शिवपुजे, डॉ अनिरुद्ध पिंपळे, तहसिलदार जगदीश निंबाळकर, गटविकास अधिकारी विनायक गुळवे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव  आदी उपस्थित होते.





तसेच सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंग, पोलीस अधिक्षक अजय कुमार बंसल, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अप्पर पोलीस अधीक्षक अजय बोराडे, सातारा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ राधाकिशन पवार यांनी माऊलीच्या पालखीला भावपूर्ण निरोप दिला.



पालखी अगमनापूर्वी आयोजित कार्यक्रमात कारुंडे येथे सोलापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने प्रबोधन पर गीतातून आरोग्य दिंडी जनजागृती करण्यात येत होती. वारकऱ्यांच्या आरोग्य तपासणी साठीची सोय झेडपी आरोग्य विभाामार्फत करण्यात आली होती. महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने sanitary नॅपकिन व्हेंडींग मशीन ठेवण्यात आली होती. 






जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता विभागाच्या वतीने पालखी मार्गावर फिरत्या शौचालयाची सोय करण्यात आली होती. मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना  आणि विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे ते पंढरपूर स्वच्छ वारी स्वस्थ वारी निर्मल वारी – हरित वारी लोकशाही वारी या दिंडीतून वारकऱ्यांचे प्रबोधन केले.



संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दिंडीचे मानकरी सोपान काका टेंभुकर महाराज यांचा व दिंडीत ५० वर्षापासून वीणा वाजविणारे कारुंडे गावचे ज्येष्ठ नागरिक यांचा जिल्हा प्रशासनाच्या  वतीने जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सत्कार केला. यानंतर मान्यवरांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या हरित वारी या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण करण्यात आले. 




सकाळपासूनच ऊन आणि ढगाचा खेळ सुरु होता. अशा  वातावरणात वारकर्‍यांची पावले पंढरीच्या दिशेने झपझप पडत होती. दिंड्यादिंड्यामध्ये भजनाला रंग भरत होता. सकाळचे काकड्याचे अभंग दिंड्यादिंड्यामधून गायले जात होते. टाळ, मृदुंगाच्या सुरेख साथीने गोड व कर्णमधुर चालीने वातावरण प्रसन्न बनले होते. पंढरी समीप आल्याने वारकर्‍यांमध्ये उत्साह संचारला होता.


SendShareTweetSend
Previous Post

Solapur : विक्रमवीर खेलबुडे यांचे डोळे का पाणावले ; दहाव्यांदा अध्यक्षपदाचा बहुमान ; म्हणाले हा तर माझा…….

Next Post

Video : काय दिंडी…,काय वारी…,काय पोरं…,काय स्वच्छ्ता…. सगळं ओकेचं ; मला दादला नको ग बाई…. विद्यार्थ्यांनी वेधले लक्ष

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

Video : काय दिंडी...,काय वारी...,काय पोरं...,काय स्वच्छ्ता.... सगळं ओकेचं ; मला दादला नको ग बाई.... विद्यार्थ्यांनी वेधले लक्ष

ताज्या बातम्या

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

16 October 2026
ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002706
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group