Thursday, August 20, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

विहिरीचा उपसा उचलण्याचे कामच झाले बंद ; खाकीतील ‘ त्रिकुटा ‘ च्या प्रतापाचे चौकशी सत्र सुरू

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
29 January 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या दुसऱ्या दिवशी, बुधवारी रस्त्यात ट्रॅक्टर्स अडवून, मुरूम वाहतूक करीत असल्याचा आरोप करुन, गुन्हा दाखल करण्याची भिती दाखवत, त्या ट्रॅक्टर्स मालकांकडून ६ हजार रुपये उकळले होते. त्यांच्या  या प्रतापाला घाबरून शेतकरी आणि ट्रॅक्टर्स मालकांनी विहिरीचा उपसा उचलण्याचे काम बंद केल्याचे दिसून येत आहे.

सोलापूर तालुका पोलीस ठाणेअंतर्गत कासेगांव पोलीस दूरक्षेत्रातील नेमणुकीस असलेले पोलीस कर्मचारी शेळके, पोतदार आणि केरुर या ‘ त्रिकुटा ‘ ने एका शेतकऱ्याच्या विहिरीचा उपसा ट्रॉलीत भरुन नेत असलेले ट्रॅक्टर्स अडवून, त्या चालकांना मुरुम चोरीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत, प्रारंभी १० हजार रुपयांची मागणी केली होती. शेवटी तडजोडीत ६ हजार रुपये घेऊन ते निघून गेले होते.

या संदर्भात ट्रॅक्टर मालक जहाँगीर शेख यांच्याशी झालेला भ्रमणध्वनीवरील संवादाची ऑडिओ क्लिप त्याच दिवशी सामाजिक माध्यमांवर काही मिनिटात प्रसारीत झाली होती. मात्र ‘ त्या ‘ पोलिसांच्या धमकीला घाबरुन  ट्रॅक्टर मालकांनी विहिरीचा उपसा वाहतुकीच्या कामाला ‘ ब्रेक ‘ लावला. यावरून ट्रॅक्टर मालकांच्या मनात त्या ‘ त्रिकुटा ‘ ची दहशत किती आहे, हेही पुढे आले आहे.

दरम्यान या ‘ त्रिकुटा ‘ तील पोतदार – शेळके यांनी गेल्या काही महिन्यात कासेगांव पोलिस दूरक्षेत्रातील कासेगांव, होनसळ गांवात गौण खनिज उत्खनन कलमांच्या आधारे गुन्हे दाखल करण्याची धमकी देऊन काही ट्रॅक्टर मालकांची आर्थिक पिळवणूक केल्याची रसभरीत चर्चा या परिसरात सुरु आहे.

शेतकरी आपल्या जमिनीत सुधारणा करण्याचे प्रयत्न करीत असतात. त्याचाच एक भाग म्हणून शेतात काळी माती टाकणे अथवा करली रानाचा पोत सुधारण्यासाठी विहिरीच्या उपशाचा गाळ आणि माती टाकणे, अशी कामे अग्रकमाने केली जातात. अशाच कामाचे ट्रॅक्टर्स अडवून खाकीतील त्रिकुटाने ६ हजार रुपयांचा ‘ मलिदा ‘ खाल्ला, त्यासंबंधी संबंधित पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी शुक्रवारपासून चौकशीचं सत्र सुरु केलं आहे.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर तालुका पोलिसांनी उकळले ६ हजार रुपये ; कायद्याची भिती दाखवत घातला, ट्रॅक्टर मालकाला गंडा

Next Post

डॉक्टर, तुम्हीसुद्धा ! गर्भवती महिलेचं सिजर करण्यासाठी स्वीकारली ९ हजार रुपयांची लाच ; कुर्डुवाडी ग्रामीण रुग्णालयातील प्रकार

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

डॉक्टर, तुम्हीसुद्धा ! गर्भवती महिलेचं सिजर करण्यासाठी स्वीकारली ९ हजार रुपयांची लाच ; कुर्डुवाडी ग्रामीण रुग्णालयातील प्रकार

ताज्या बातम्या

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026
शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

3 August 2026
सोलापूर शहराजवळ भीषण अपघात ; एसटी घुसली सळईच्या ट्रकमध्ये ; चालकासह महिला जागेवरच ठार

सोलापूर शहराजवळ भीषण अपघात ; एसटी घुसली सळईच्या ट्रकमध्ये ; चालकासह महिला जागेवरच ठार

31 July 2026

क्राईम

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

by प्रशांत कटारे
23 July 2026
0

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच सोलापूर : मोहोळ तालुक्यात पकडलेल्या तिन्ही...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
13 July 2026
0

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात जप्त केलेला मुरूम वाहतूक करणारा ट्रक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1995769
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group