सोलापूर : मराठा समाज सेवा मंडळ संचलित, छत्रपती शिवाजी हायस्कूल, सोलापूर येथील शिक्षकेवर १५ ऑगस्ट १९९३ ते २८ जून २०२२ कालावधीत संस्थेचे अध्यक्ष मनोहर सपाटे यांनी छत्रपती शिवाजी शाळा, शिवपार्वती लॉज व वसंत विहार येथील पत्राशेड मध्ये अत्याचार केल्याची लेखी तक्रार पीडित शिक्षिकेने १९ सप्टेंबर २०२२रोजी पोलीस उपायुक्त यांच्याकडे केली आहे. त्या तक्रारीच्या अनुषंगाने मनोहर सपाटे यांच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल करून त्याला तातडीने अटक करावी अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने पोलीस आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.
जिथे शिक्षणासारखे पवित्र कार्य चालते अशा पवित्र ठिकाणी मनोहर सपाटे यांच्यासारखे संस्था अध्यक्ष पदाचा धाक दाखवून गुरुजनांवर जर असे अन्याय अत्याचार करीत असतील तर त्यासारखी दुसरी लाजिरवाणी गोष्ट नाही. तसेच मनोहर सपाटे हे शाळेतील अन्य इतर शिक्षक-शिक्षिका व शिक्षि कर्मचारी यांच्यावरही अन्याय-अत्याचार केल्याच माहिती मिळालेली आहे. त्यामुळे म समाज सेवा मंडळ या संस्थेवर तातडीने प्रशास नेमून शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षिवे कर्मचारी यांची चौकशी करून सपाटेवर गुन्हा दाखल करावा असे निवेदनात म्हटले आहे.
मराठा समाजात शैक्षणिक प्रचार व प्रसार व्हावा, या उदात्त हेतूने कै. अॅड. ए. तु. माने, ब्रम्हदेव माने, निर्मलाताई ठोकळ, शंकरराव कोल्हे, जगन्नाथ भोईटे यासह सोलापूरच्या मराठा समाजातील लोकांनी वर्गणी काढून स्थापन केलेल्या मराठा समाज सेवा मंडळ, 101 ब, मुरारजी पेठ, सोल या संस्थेच्या मा. दान शाळेतच मराठा शिक्षिकेवर अन्याय अत्याचार झालेला आहे. याबाबत सर्वसामान्य मराठ्यांच्या तीव्र भावना असून व संस्थाध्यक्ष सपाटे यांचेविषयी चीड निर्माण झाली आहे. त्यामुळे मनोहर सपाटेवर अत्याचाराचा गुन्हा दाखल करून संबधित संस्थेवर तातडीने प्रशासक नेमून निपक्ष तपास करावा असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या निवेदनावर दास शेळके, नाना काळे, दिलीप कोल्हे, सुनिल रसाळे, शशि थोरात, प्रताप चव्हाण, तुकाराम मस्के, बजरंग आवताडे, शेखर फंड, सोमेश पवार, उत्तम खुटे, रामचंद्र कदम, डी. एन. जाधव, जयवंत सुरवसे, विजय पोखरकर आदींनी सह्या केल्या आहेत.



















