Sunday, October 11, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

राष्ट्रवादीच्या पक्षावाढीला गटबाजीने ‘ब्रेक’ ; वाद शमणार की वाढणार? | Special Report

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
8 August 2021
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पार्टीच्या ताकदीपुढे सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची दादागिरी सुद्धा नांगी टाकली होती. सोलापुरातील  राष्ट्रवादीचे काही दिग्गज नेते भाजपच्या  गळाला लागले, काही जण त्यांच्या दारात जाऊन आले अशा परिस्थितीत सुद्धा राष्ट्रीय नेते शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी राज्यांमध्ये सत्ता आणली. पक्ष सध्या राज्यांमध्ये सत्तेत पावरफुल आहे असे असताना पक्ष संघटना वाढीसाठी शहर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी झोकून दिले पाहिजे मात्र सोलापुरात पक्ष वाढीलाच ब्रेक लागत असल्याचे चित्र आहे.

जिल्ह्याचे अध्यक्ष बळीराम काका साठे, जिल्ह्याचे कार्यकारी अध्यक्ष उमेश पाटील यांच्यामध्ये सध्या अंतर्गत वाद उफाळून आला आहे. उमेश पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या गटात तसेच नगरपालिकेच्या क्षेत्रात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रवादी आपल्या दारी, नागरीकांचा जनता दरबार हा कार्यक्रम घेण्याची संकल्पना समोर आणली. या कार्यक्रमाची घोषणा खुद्द प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोलापुरात एका कार्यक्रमात केली. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष काका साठे, प्रदेश उपाध्यक्ष दीपक साळुंके यांच्या उपस्थितीत झाले . बहुतांश यापूर्वी कोणत्याही राष्ट्रवादीच्या नेत्याला अशी संकल्पना सुचली नसावी असा कार्यक्रम सध्या राष्ट्रवादीचे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष उमेश पाटील जिल्ह्यात राबवत आहेत., कार्यक्रमाला प्रचंड असा प्रतिसाद पाहायला मिळत असल्याचं दिसत आहे नागरिक आपले प्रश्न, समस्या, वैयक्तिक,अडी-अडचणी, मुलांच्या शिक्षणाचे, रस्त्याचे, शेत जमिनीचे, घराचे, गावातील अतिक्रमण असे विविध प्रश्‍न या जनता दरबारात मांडत आहेत.

 याच दरम्यान हा जनता दरबार दक्षिण सोलापूर तालुक्यात मध्ये सुरू होता त्याच वेळी दक्षिण तालुक्याचे तालुका अध्यक्ष सुभाष पाटील यांना बदलून बीपीन करजोळे यांना अध्यक्षपदाचे पत्र जिल्हाध्यक्ष काका साठे यांनी प्रदेशाध्यक्ष यांच्या उपस्थितीत दिले. मात्र हा कार्यक्रम ज्या तालुक्यात सुरू होता त्याच दिवशी त्या तालुकाध्यक्षला बदलणे कितपत योग्य होते, तो पक्षासह त्या कार्यकर्त्यांचा अपमान होता अशी भाषा सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता करत आहे.

याप्रकरणी उमेश पाटील यांनी तडकाफडकी तालुका अध्यक्ष निवडीला स्वतःच्या अधिकारात स्थगिती दिली, ते म्हणतात जिल्हा कार्यकारी अध्यक्षपद घेताना मी पक्षाकडून काही अधिकार मला घेतलेले आहेत ते अधिकार वापरण्याचा मला अधिकार आहे. ज्यावेळी सुभाष पाटील यांची 2020 मध्ये नियुक्ती झाली त्या पत्रावर माझी सुद्धा सही आहे, मग माझ्या सही शिवाय अध्यक्ष बदलला कसा? ज्या तालुका अध्यक्षाने चांगला कार्यक्रम घेतला, त्याला पदावरून काढले हे योग्य नाही अशी भूमिका उमेश पाटील यांनी व्यक्त केली.

त्यावर जिल्हाध्यक्ष काका साठे यांची प्रतिक्रिया आली घेतली असता पक्षाच्या घटनेत कार्यकारी अध्यक्षपद नाही त्यामुळे उमेश पाटलांना तालुका अध्यक्ष बदलाचे अधिकार नाहीत, करजोळे हेच अध्यक्ष राहतील असे ठणकावून सांगून वादाला आणखी तोंड फोडले. दुसऱ्या दिवशी काका साठे हे दक्षिण सोलापूर तालुक्यातील गुंजेगाव या ठिकाणी गेले असता त्या गावातील कार्यकर्त्यांनी उलट काका साठे यांच्यावरच रोष व्यक्त केला तुम्ही तालुका अध्यक्ष कसा काय बदलला त्याची गरज होती का? सुभाष पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत होतो असे अनेक प्रश्‍न काकांसमोर कार्यकर्त्यांनी उपस्थित केले.कार्यकर्त्याचा रोष पाहता ते बैठक सोडून निघून गेले, याची चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमधून आहे. तसा व्हिडिओ सुद्धा प्रसार माध्यमावर व्हायरल झाला आहे.

एकूणच सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची परिस्थिती आणि काका साठे व उमेश पाटील यांच्यातील वाद पाहता राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना पक्ष वाढवायचा की त्याला ब्रेक द्यायचा हेच कोडे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पडलंय. आता यावर पक्षाचे वरिष्ठ काय निर्णय घेतात  याकडेच शहर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

SendShareTweetSend
Previous Post

धक्कादायक ! दावल मलिकच दर्शन ठरलं अखेरचं, सम वयाच्या तिघांचा बुडून मृत्यू

Next Post

solapur | Special Report | Factionalism ‘breaks’ NCP’s growth; Will the dispute subside or escalate? |

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

solapur | Special Report | Factionalism 'breaks' NCP's growth; Will the dispute subside or escalate? |

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002295
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group