सोलापूर : राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत हे शनिवार ११ फेब्रुवारी रोजी सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. संपूर्ण दिवसभर त्यांचा भरगच्च असा दौरा कार्यक्रम राहणार आहे. दुपारी दीड वाजता त्यांचे सोलापूर विमानतळावर आगमन होईल त्यानंतर ते शासकीय विश्रामगृहाकडे जातील.
दुपारी दोन ते चार या दरम्यान नियोजन भवन या ठिकाणी सोलापूर जिल्हा औद्योगिक विकास महामंडळ व उद्योग विभागाचा आढावा घेतील. या बैठकीनंतर सोलापूर जिल्ह्यातील औद्योगिक संघटनासोबत त्यांची चर्चा होणार आहे.
दुपारी चार वाजता शासकीय विश्रामगृह याठिकाणी बाळासाहेबांची शिवसेना प्रमुख पदाधिकारी यांची ते बैठक घेणार आहेत. त्यानंतर पत्रकार परिषद होऊन चिंचोली येथे औद्योगिक परिक्षेत्र पाहणी करणार आहेत. या कार्यक्रमानंतर ते माढ्याला जातील.


















