Wednesday, June 24, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

रमेश बारसकरांनी काका साठेंच्या निष्ठेची उंची मोजू नये ; पदाचा व पक्षाचा वापर अवैध धंद्यासाठी करणा-यांचे हे बोलणे बेताल

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
5 August 2022
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

उत्तर सोलापूर (तालुका प्रतिनिधी) :- राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीरामकाका साठे यांच्या विरोधात मोहोळचे माजी नगराध्यक्ष रमेश बारसकरांनी केलेले वक्तव्य हे बालिशपणाचे असून काका साठे यांनी आयत्या पिठावर रेघोट्या मारल्या नाहीत. तर त्यांचे सारे आयुष्य संघर्षातच गेले आहे. तेव्हा पदाचा व पक्षाचा वापर अवैध धंद्यासाठी करणा-यांचे हे बोलणे बेताल असल्याची खरमरीत प्रतिक्रिया उत्तर सोलापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस हरिभाऊ  घाडगे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. 

मोहोळचे माजी आमदार राजन पाटील व त्यांच्या परिवारावर पक्षातीलच माणसांकडून खालच्या पातळीवर जाऊन टीका होत असेल तर ती पक्षाचे जिल्ह्याचे प्रमुख या नात्याने पक्षश्रेष्ठींना सांगितले आणि चाललेले योग्य नाही, हे जाहीररित्या बोलल्यानंतर बारसकरांसारख्या जबाबदार पदाधिका-याला का झोंबावे, असा सवाल करुन घाडगे म्हणाले की, “काका साठे हे नेत्याच्या कानात बोलणारे नेते नाहीत. तर जे पोटात तेच ओठात, असे हजरजबाबी नेते आहेत. 

काका साठे यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा जेवढा अनुभव आहे, तेवढे बारसकरांचे वय नाही. तेव्हा त्यांनी काका साठें यांच्याबद्दल केलेले वक्तव्य म्हणजे जमिनीवर उभाराहून आभाळाला लाथा मारण्याचा हा प्रकार आहे. गेली 55 वर्षांपासून काका साठे हे देशाचे नेते खा.शरद पवार साहेबांवर नितांत निष्ठा ठेवून काम करीत आहेत. पक्षाचा वापर त्यांनी दोन नंबर धंद्यासाठी किंवा अधिका-यांच्या बदल्यांसाठी केलेला नाही, हे बारसकरांनी लक्षात घ्यावे. काकांच्या निष्ठेची नोंद पवार कुटुंबियांकडे आहे. आजवर काका साठे यांनी पदाचा वापर स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी, प्रपंचासाठी केला नाही. 

सर्वसामान्य लोकांसाठी आणि कार्यकर्त्यांसाठीच त्यांनी सामाजिक, राजकीय जीवन वेचले आहे. गेल्या अडीच वर्षात राज्यात सत्ता असताना देखील त्यांनी स्वतःच्या लेटरहेडचा वापर कोणा अधिका-याच्या बदलीसाठी केलेला नाही,हेही बेताल वक्तव्य करणा-या बारसकरांनी ध्यानात घ्यावे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्मितीच्यावेळी काँग्रेसकडून आमदारपदाची आलेली संधी लाथाडून खा.पवार यांच्यापाठीशी उभे राहण्याचा पहिला निर्णय काका साठे यांनी घेतला आहे. जर बारसकरांना ही आफर कोणी दिली असती तर त्यांनी निष्ठा गहाण टाकली असती. पदाचा वापर अवैध धंद्यासाठी करुन पक्षाची प्रतिमा मलीन करणा-या बारसकरांनी काका साठेंच्या निष्ठेची उंची मोजू नये.“

उत्तर सोलापूर तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील जाणकार जनतेला काका साठे यांचे काम माहीत आहे. सर्वसामान्यांच्या न्याय व हक्कासाठी झटणारे नेतृत्व म्हणजे काकांच नेतृत्व आहे.

 या वयातही तरुणांना लाजवेल अस नेतृत्व आहे.  पक्षाचा कार्यक्रम असला तर शेकडो हजारो कार्यकर्ते सोबत घेऊन काका साठे हजर असतात. फक्त स्टेजवर नेत्यांच्या कानात बोलताना फोटो काढणारे पुढेपुढे करणे त्यांना  जमत नाही. तेव्हा अशा नेतृत्वाबद्दल यापुढे बोलताना विचार करावा,असा इशाराही घाडगे यांनी दिला.

SendShareTweetSend
Previous Post

भीषण अपघात ! ट्रक-कारची समोरासमोर धडक ; पती-पत्नी जागीच ठार ; टेम्भुर्णी जवळील घटना

Next Post

पूलावरून ओसंडून वाहणाऱ्या पाण्यामुळे कासेगांवचा संपर्क खंडीत ; ४० वर्षापूर्वीचा जूना पूल पाडून बांधण्यात आलेल्या पूलाने निर्माण केला ‘ खड्डा ‘

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

पूलावरून ओसंडून वाहणाऱ्या पाण्यामुळे कासेगांवचा संपर्क खंडीत ; ४० वर्षापूर्वीचा जूना पूल पाडून बांधण्यात आलेल्या पूलाने निर्माण केला ' खड्डा '

ताज्या बातम्या

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

18 June 2026
धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

12 June 2026
सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026
बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026
आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

3 June 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

2 June 2026
सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

31 May 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

Our Visitor

1985950
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group