मुंबई : मौजे मोहोळ,तालुका मोहोळ येथे पंढरपूर रोडवरील किंग लायन लॉज येथे अवैधरित्या कुंटणखाना चालू असल्याचे माहिती मिळाल्यावरून मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलिसांनी चालक जयपाल संजय पवार यास दिनांक – 07/01/2022 रोजी अटक करून अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियम- 1956 चे कलम 3,4,5 व भारतीय दंड संहिता (भा. द. वि.) कलम 370 (2) प्रमाणे मोहोळ पोलीस स्टेशन येथे गुन्हा गुन्हा नोंद केला होता.
या प्रकरणी जामीन मिळावा, याकरिता आरोपीने अॅड.पी.एल. सारडा, अॅड.अजय रणशृंगारे, अॅड.सुरज पाटोळे यांच्या करवी मे.ना.मुंबई उच्च न्यायालय मध्ये अर्ज दाखल केला होता. सदर अर्जाची सुनावणी जस्टीस नाईक यांच्या कोर्टासमोर होऊन आरोपीच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य करुन कोर्टाने आरोपीचा जामीनावर मुक्तता करण्याचा आदेश केला. सदर आरोपी तर्फे अर्जाचे कामकाज अॅड.पी.एल.सारडा, अॅड.अजय रणशृंगारे, अॅड.सुरज पाटोळे, अॅड.विशाल मस्के यांनी पाहिले.


















