Saturday, June 27, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

पहिला वहिला मामाश्री चषक दीपक सीसी संघाला ; एसएसआयला उपविजेतेपद | Solapur

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
8 October 2022
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या (१ जून) वाढदिवसानिमित्त सोलापुरातील राष्ट्रवादीचे माजी गटनेते किसन जाधव व माजी नगरसेवक नागेश गायकवाड आणि इच्छा भगवंताची स्पोर्ट्स क्लब चेतन गायकवाड यांच्या संयुक्त विद्यमाने मामाश्री चषक 2022  लेदर बॉल टी 20 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, याअंतर्गत  सोलापूर मधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुल (रेल्वे मैदान) येथे दीपक सीसी विरुद्ध एसएसआय या दोन संघादरम्यान अंतिम सामना पार पडला व यात शेवटच्या चेंडूवर दीपक संघाने विजेतेपद पटकावले आणि मानाच्या पहिल्या वहिल्या मामाश्री चषकावर नाव कोरले.

कोरोनाच्या दोन वर्षाच्या कालावधीनंतर व सोलापुरात जवळपास तीन वर्षानंतर अशी लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती व यात एकूण आठ संघाने भाग घेतला होता व एकूण पंधरा सामने पार पडले.

अगदी शेवटच्या चेंडू पर्यंत रंगलेल्या अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना दीपक सीसी संघाने २० षटकात ७ बाद १९६ धावा केल्या होत्या, या धावांचा पाठलाग करताना एस एस आय संघाला शेवटच्या १ चेंडूवर ५ धावांची गरज होती परंतु फलंदाज बाद करत दीपक सीसी संघाने ४ धावांनी सांघिक बळाच्या जोरावर विजेतेपद पटकाविले. (एस एस आय : २० षटकात ९ बाद १९२)

अंतिम सामना झाल्यावर प्रमुख पाहुणे पत्रकार समाधान वाघमोडे, पत्रकार रवी मस्के, सत्तार सय्यद व प्रमुख आयोजक नागेश गायकवाड तसेच सत्यम स्पोर्टसचे सतिश भोसले यांच्या प्रमुख हस्ते बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडला.

आयोजकांच्या वतीने देण्यात येणारे अंतिम सामन्यातील विजेत्या दीपक संघाला पत्रकार समाधान वाघमोडे यांच्या हसत अतिशय सुंदर असा चषक तसेच 15000 रुपये रोख व उपविजेत्या एस एस आय संघाला सत्तार सय्यद यांच्या प्रमुख हस्ते चषक व 11 हजार रुपये रोख देण्यात आले तसेच स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज – समीर शेख, उत्कृष्ट गोलंदाज – अंबादास तोरा, अंतिम सामन्यातील सामनावीर – समीर शेख व मालिकावीर – सईद जहागीरदार यांना पुरस्कृत करण्यात आले.

बक्षीस वितरण पूर्वी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत सत्कार संयोजक व इच्छा भगवंताची स्पोर्ट्स क्लब च्या वतीने  करण्यात आला.

इच्छा भगवंताची स्पोर्ट्स क्लबचे प्रमुख तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश चिटणीस चेतन गायकवाड व त्यांचे मित्र परिवार किरण शिंदे, अमोल जगताप,  लकी चव्हाण, फिरोज पठाण, ऋषभ प्याटी, ऋषी येवले यांनी ही स्पर्धा संयोजक निलेश गायकवाड, सचिन गायकवाड, नबीलाल पटेल यांच्या सहकार्याने अतिशय व्यवस्थितपणे ही स्पर्धा पार पाडली. बक्षीस वितरण समारंभाचे सूत्रसंचालन राष्ट्रवादी सोशल मीडिया जिल्हाअध्यक्ष मिलिंद गोरे यांनी केले.

संक्षिप्त धावफलक :

दीपक सीसी : २० षटकात ७ बाद १९६

समीर शेख ९१ धावा, वसीम शेख २८ धावा, लखन गावडे १९ धावा

अंबादास तोरा २४/३ बळी, सत्यजित जाधव २ बळी, प्रथमेश राठोड १ बळी

एस एस आय : २० षटकात ९ बाद १९२

निखिल धोरणाल 51 धावा दीपक राजूल 46 धावा राहुल मंजेली 21 धावा

सईद जहागीरदार ३ बळी, संतोष नलावडे २ बळी, लखन गावडे वसीम सौदागर अजहर अलगूर मुन्ना शेख प्रत्येकी एक बळी.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर : सोलापुरात यंदा मकरंद अनासपुरे व महाराष्ट्र हास्य जत्रेच्या कलाकारांना भेटण्याची मेजवानी ; तीन दिवस रंगणार गप्पा ; कूठे वाचा

Next Post

मोहोळ येथील लॉजमध्ये कुंटणखाना चालवण्या प्रकरणी न्यायालयाने दिला हा निकाल

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

मोहोळ येथील लॉजमध्ये कुंटणखाना चालवण्या प्रकरणी न्यायालयाने दिला हा निकाल

ताज्या बातम्या

अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

26 June 2026
धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

18 June 2026
धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

12 June 2026
सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026
बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026
आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

3 June 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

2 June 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

Our Visitor

1986196
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group