Thursday, August 27, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

माझी मुले, माझी जबाबदारी : पालकांनो, बालरोगतज्ज्ञ काय सांगतात वाचा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
23 May 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 


सोलापूर,दि.22 : सध्या कोरोनाची दुसरी लाट पहिल्या लाटेच्या तुलनेत अधिक धोकादायक असल्याची दिसत आहे. कोरोनाचा संसर्ग वेगानं होत आहे. मोठ्या माणसांसोबतच लहान मुलांना कोरोना संसर्ग होत आहे. मोठ्या व्यक्तींच्या तुलनेत गुंतागुंतीच्या केसेस कमी आहेत. तिसऱ्या लाटेबाबत केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने लहान मुलांना अधिक धोका असल्याची भीती व्यक्त केली आहे, यामुळे पालकांनी ‘माझी मुले..माझी जबाबदारी’ ओळखून अधिक सजग राहून लसीकरण करून घेण्याचा सल्ला बालरोगतज्ज्ञ डॉ. अतुल कुलकर्णी यांनी दिला आहे. याबाबत त्यांच्याशी साधलेला संवाद….

कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात केवळ एक टक्का तर दुसऱ्या टप्प्यात 10 टक्के मुलांना बाधा झाल्याचे दिसून येत आहे. वयस्करांमध्ये कोरोनामुळे आजार बळावत असून काही लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर त्यांच्यात कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. वयस्क आणि लहान मुलांना कोरोनाची लक्षणे सारखीच असतात.


कोरोनाचा संसर्ग झालेल्या मुलांमध्ये ताप, सर्दी, खोकला आणि गॅस्ट्रोची लक्षणे दिसून येत आहेत. मुलांना धोका आपल्या पालकांपासून जास्त असतो, तेच मुलांच्या संपर्कात जास्त असतात. यामुळे पालकांनी घरी गेल्यावर हात-पाय साबणाने स्वच्छ धुवावेत, कपडे बदलून लहान मुलांना घ्यावे, असेही डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.

·         लक्षणे

ताप येणे, सर्दी, खोकला.

चव जाणे, वास न येणे.

धाप लागणे.                 

पोटात दुखणे

उलट्या/जुलाब होणे.

डोळे लाल होणे.

अंगावर पुरळ उठणे.

भूक न लागणे किंवा कमी होणे.

·         प्रतिबंधात्मक उपाय

मास्कचा वापर करावा. मात्र दोन वर्षांच्या खालील बालकांना श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो, यामुळे त्यांना मास्क वापरण्यास देऊ नये.

सुरक्षित अंतर ठेवून खेळणे.

घरातील मोठे कार्यक्रम टाळावेत.

गर्दीच्या ठिकाणी, कार्यक्रमात लहानांना घेऊन जावू नये.

सॅनिटायझरच्या वापराऐवजी हात साबणाने स्वच्छ धुणे.  

·         पालकांनी काय काळजी घ्यावी

            पालक बाहेरून आल्याने मुलांना संसर्ग करू शकतात.

बाहेरून आल्यानंतर कपडे बदलून, हात-पाय साबणाने धुतल्यानंतर मुलांना जवळ घ्यावे.

18 वर्षांवरील घरातील सर्व व्यक्तींनी लसीकरण करून घ्यावे.

स्तनदा माता लस घेऊन बाळाला स्तनपान करु शकतात.

लहान मुलांच्या स्वच्छतेवर अधिक भर द्यावा.

मुलांना सतत घराबाहेर घेऊन जाऊ नये. 

·         हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची गरज कधी भासते?

            मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला तरी त्यांच्यामध्ये लक्षण दिसून येत नाहीत. मात्र इतरांना बाधा होऊ नये, यासाठी घरी आराम करावा. श्वास घ्यायला त्रास होत असेल तेव्हाच हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची गरज असते. मुलांच्या फुफ्फुसांची तपासणी करून संसर्ग वाढला आहे का, रुग्णाला ऑक्सिजन किंवा औषधांची गरज आहे का, हे डॉक्टर ठरवतात.  

·         लक्षणाप्रमाणे उपचार

            लहान मुलांना कोरोनाच्या लक्षणानुसार उपचार दिले जातात. सौम्य लक्षण असली तर केवळ विलगीकरण करणे, ताप असेल तर पॅरासिटीमॉल गोळ्या दिल्या जातात. या काळात आराम, भरपूर पाणी आणि सकस आहाराची गरज आहे.

मध्यम स्वरूपाची धाप, ताप आणि खोकला ही लक्षणे असल्यास मुलांना दवाखान्यात ॲडमिट करावे लागते. यावेळी सलाईन, ॲन्टीबायोटिक दिली जातात.

तीव्र प्रकारात खूप धाप असेल, धुंदी, झटका, रक्तदाब कमी होणे, संडास आणि ऑक्सिजनची पातळी 90 टक्केच्या खाली गेली असेल तर मुलांना अतिदक्षता विभागात (आयसीयू) दाखल करावे लागते. सलाईन, ॲन्टीबायोटिक, ऑक्सिजन, स्टेरॉईड आणि रेमडेसिवीर इंजेक्शनची गरज मुलांना भासते. शिवाय एनआयव्ही, बायपॅप आणि व्हेन्टिलेटरचाही वापर केला जातो. मात्र पालकांनी घाबरून न जाता, लक्षणे दिसल्यास त्वरित उपचार करून घ्यावेत, मात्र अशा सिरीयस केसेस खूपच कमी आहेत, असेही डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.  

·         कोरोना झाल्यानंतरही मुलांची काळजी घ्या

            मुलांना कोरोना होऊन गेल्यानंतर तीन ते सहा आठवड्यात मल्टिसिस्टीम इफ्लेमेटरी सिड्रोम इन चिल्ड्रनचा (एमआयएससी) त्रास होतो. यामध्ये अंग, डोळे लाल होतात. रक्तदाब कमी होतो आणि हृदयाला सूज येते. या काळात मुलांना ॲडमिट करून त्वरित उपचाराची गरज असते. स्टेरॉईड, ॲस्पिरीन आणि इमिनोग्लोब्यूलिन या औषधांचा वापर करून रूग्णांवर उपचार केले जातात, असेही त्यांनी सांगितले.  

·         काय काळजी घ्याल…

            तिसऱ्या लाटेमध्ये मुलांना जास्त धोका असल्याने पालकांनी आतापासूनच काळजी घ्यायला हवी. कार्यक्रम, गर्दीच्या ठिकाणी मुलांना घेऊन जावू नये. लसीकरण करून घ्यावे.

बाहेरून आल्यानंतर हात-पाय साबणाने स्वच्छ धुवा.

मुले जास्त बाहेर जाणार नाहीत, याची खबरदारी घ्या.

घरातील व्यक्तींनी कोरोनाची लक्षण दिसल्यास विलगीकरणात रहावे आणि योग्य निदान करून उपचार घ्यावेत.

मुलांना योग्य आणि सकस आहार द्या. मास्कचा वापर, सुरक्षित अंतर आणि हात धुणे, याबाबत लक्ष द्या.

मुलांना लक्षण दिसल्यास त्वरित तपासणी करून डॉक्टरांकडून उपचार करून घ्या. या काळात आहार आणि विश्रांतीवर भर द्या.

लहान मुलांची लस आल्यास लसीकरण करून घेणे, यामुळे संसर्ग होण्याचा धोका कमी होईल, असेही डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.

SendShareTweetSend
Previous Post

कोविड सेंटरमध्ये उजाडली ‘योग सकाळ’ ‘ओम’नाम जप व प्राणायामातून कोरोनामुक्तीचा जागर

Next Post

रुपेश भोसले तेरा क्या कहना…,रुग्णसेवा, आरोग्यसेवेसह वंचित-निराधारांना अन्नदान करत जोपासली सामाजिक बांधिलकी

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

रुपेश भोसले तेरा क्या कहना...,रुग्णसेवा, आरोग्यसेवेसह वंचित-निराधारांना अन्नदान करत जोपासली सामाजिक बांधिलकी

ताज्या बातम्या

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026

क्राईम

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1996600
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group