Thursday, April 30, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

भाजपच्या या ज्येष्ठ नेत्याने बोलून दाखवली खंत !”विमानतळावर फक्त स्वागत करण्यापुरते प्रोटोकॉलमध्ये बसलो तरी बस्स”

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
6 July 2021
in solapur
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर | पूर्वाश्रमीची राष्ट्रवादी काँग्रेसची तोफ, पवार साहेबांच्या अत्यंत जवळचे समजले जाणारे मात्र अजितदादांशी कधीच न पटणारे नेते, माजी मंत्री प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे सर. हे सध्या भारतीय जनता पक्षाच्या निवडणूक प्रचाराचे काम करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री राहूनही सरांना पक्षाने मोहोळ विधानसभा मतदारसंघातून तिकीट दिले नाही, ते अपक्ष लढले, पराभव झाला, 

भाजपचे सरकार राज्यात आले,  भाजपने सर्वांचीच अडचण करण्यास सुरुवात केली, सर शिक्षण सम्राट, सरांच्या अनेक संस्था, सुतमिल. सरांनी भाजपशी जवळीक केली, केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी हे सोलापूर दौऱ्यावर आले असता त्यांना हार घालताना ते त्यांच्या पाया पडले, तो फोटो इतका व्हायरल झाला की, सरांवर टीकेची झोड उठली. तत्कालीन सहकार मंत्री सुभाष देशमुखांच्या जवळ गेले मात्र बापूनी जास्त अंगाला लावून घेतलं नाही. 

शेवटी जानेवारी 2019 मध्ये त्यांनी जालना इथे राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ काढून टाकले व भाजपचे कमळ हाती घेतले. सरांच्या डोक्यात सोलापूर लोकसभा मतदारसंघ होता, शरद बनसोडे यांच्या कारनाम्यांना भाजप वैतागले होते,  इतर दुसरा कुणी उमेदवार नव्हता, सरांना वाटले आपली डाळ शिजेल मात्र हिरमोड झाला, बोगस माणसाला दाखला देऊन भाजपने खासदार केले. शेवटी सरांनी माळशिरस व मोहोळवर आशा लावली. परंतू, सरांचा विचार झाला नाही,

 निवडणूका झाल्या राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले, मात्र तीन तिघाडी, काम बिघाडी, सरकार असल्याने ते कधी ही पडू शकते ही आशा ठेवत सरांनी भाजप सोबतच राहणे पसंत केले आहे, सध्या ते निवडणुकांमध्ये स्टेज गाजवत आहेत, पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूक आपल्या भाषणाने चांगलीच गाजवली, अजित पवारांवर मनसोक्त तोंडसुख घेतले, भाजपने निवडणूक जिंकल्याने सरांसह सर्वांचेच “समाधान” झाले. 

अजूनही सरांचा विचार भाजप कुठे ही करत नसल्याचे चित्र आहे. सध्या ते आपल्या बहुजन रयत परिषदेच्या माध्यमातून निर्धार संवाद अभियान राबविणार आहेत, मातंग समाजाच्या न्याय हक्कासाठी ते आवाज उठवत आहेत. दरम्यान पत्रकारांनी भाजप कडून काय अपेक्षा आहेत अशी विचारणा केली, तेव्हा त्यांनी विमानतळावर फक्त स्वागत करण्यापुरते प्रोटोकॉलमध्ये बसलो तरी बस्स असे सांगून नाराजी तर व्यक्त केलीच मात्र ज्येष्ठतेचा विचार व्हावा अशी अपेक्षा ही व्यक्त केली.

SendShareTweetSend
Previous Post

उत्तर तालुक्यात पृथ्वीराज माने युवा मंचची स्थापना : तालुका अध्यक्षपदी सुनील जाधव यांची निवड

Next Post

ब्रेकिंग ! ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

ब्रेकिंग ! ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन

ताज्या बातम्या

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026
सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

14 April 2026
‘स्टँडिंग, बांधकाम, समाज कल्याण अन् जलसंधारण’ समितीला डिमांड ; सदस्यांची नेत्यांमार्फत फिल्डिंग

‘स्टँडिंग, बांधकाम, समाज कल्याण अन् जलसंधारण’ समितीला डिमांड ; सदस्यांची नेत्यांमार्फत फिल्डिंग

10 April 2026

क्राईम

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

Our Visitor

1978901
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group