Sunday, October 18, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

‘भांजे’नी केला अक्कलकोट तालुक्यात शिक्षण विभागाचा ‘खेळखंडोबा’ ; अनेक प्रकरण येऊ लागले समोर

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
27 December 2021
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : अक्कलकोट तालुक्याचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी अशोक भांजे हीच व्यक्ती सध्या सोलापूर जिल्हा परिषदेत चर्चेचा विषय झाली आहे. अशा अधिकाऱ्यांना एकाच टेबलावर वर्षानुवर्षे कसे काय ठेवले जाते हा मुळात मोठा प्रश्न आहे. माध्यमिक शिक्षण विभाग विस्तार अधिकारी या टेबलावर एक नाही दोन नाही तर तब्बल अकरा वर्ष ठेवणे म्हणजे एकप्रकारे भ्रष्टाचाराला  शासनानेच चालना दिल्यासारखे आहे. 

जिल्हा परिषदेला संवेदनशील असे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी मिळाले, शिक्षण विभागाला आशेचा ‘किरण’ म्हणून लोहार मिळाले. मात्र त्यांनी अशा अधिकाऱ्यांवर लक्ष ठेवण्याऐवजी उलट पाठराखण केल्याचं चित्र पहायला मिळत. आता अशोक भांजे यांच्या अनेक प्रकरणांची चर्चा जिल्हा परिषद मध्ये होऊ लागली आहे. शिक्षण विभागात तर त्यांचा एकाच टेबलावर मुक्काम असताना दुसरीकडे अक्कलकोट तालुक्यात गटशिक्षणाधिकारी पदावर सुमारे दहा वर्षाहून अधिक काळ त्यांनी आपला जम बसवला असल्याची माहिती मिळाली आहे. 

यापूर्वी सुमारे आठ वर्षे आणि आता जवळजवळ दोन वर्षे होत आली ते अक्कलकोट तालुक्यात आहेत. अक्कलकोट तालुक्यात जवळपास 27 हजार विद्यार्थी, साडेनऊशे शिक्षक असताना 20 केंद्र प्रमुख पैकी केवळ सहा केंद्रप्रमुख कार्यरत आहेत. दोन विस्तार अधिकारी आहेत, ते सुद्धा प्रभारी आहेत. त्यामुळे अक्कलकोट तालुक्यात शिक्षण विभागाचा खेळखंडोबा झाल्याचं चित्र आहे. किती शिक्षक शाळेत शिकवतात? किती बाहेर फिरतात? शाळेत शिक्षकांनी तर पाच ते दहा हजार रुपये मानधनावर स्वतःच्या जागेवर शिक्षक ठेवले असून स्वतः बाहेर पुढारपण करत फिरत आहेत असं चित्र अक्कलकोट तालुक्यात असल्याचे बोलले जाते.

नुकतच पंचायत समितीच्या मासिक सभेमध्ये सभापती सह इतर सदस्यांनी गट शिक्षणाधिकारी अशोक भांगे यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र असा संताप व्यक्त केला जर अशी परिस्थिती असेल तर अक्कलकोट तालुक्यातील शिक्षणाचा दर्जा कसा सुधारणार असे ताशेरे सर्व लोकप्रतिनिधींनी भांजे यांच्यावर ओढल्याचे  समजले. 

याचबरोबर भांजे यांच्यावर आरोप होत आहेत की, अक्कलकोट तालुक्यातील गळोरगी गावातील कन्नड शिक्षक तीन दिवस अटक असताना त्या शिक्षकाला शाळेवर हजर राहण्याचा रिपोर्ट दिला.  तो शाळेवर हजर झाला, खानापूर मराठी शाळेतील एक शिक्षक बडतर्फ असताना त्याचे वेतन काढल्याचा आरोप होत आहे. 

SendShareTweetSend
Previous Post

सीईओ साहेब, तुम्ही पारदर्शक | नववर्षाची आम्हाला भेट द्या..!सोलापूर झेडपी संघटनांनी का केली मागणी

Next Post

ब्रेकींग | सुशीलकुमार शिंदेंच्या भाषणाने शरद पवारांच्या भाषणाची आठवण | जे बदमाशी करतात त्यांची नक्कीच विल्हेवाट लावणारप

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

ब्रेकींग | सुशीलकुमार शिंदेंच्या भाषणाने शरद पवारांच्या भाषणाची आठवण | जे बदमाशी करतात त्यांची नक्कीच विल्हेवाट लावणारप

ताज्या बातम्या

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

16 October 2026
ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002612
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group