Wednesday, August 26, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

ब्रेकींग ! सोलापूरात रविवारपासून सर्व दुकाने रात्री 10 पर्यंत सुरू? ; सही पूर्वीच महापालिका आयुक्त शिवशंकर यांचा सुधारित आदेश झाला व्हायरल

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
13 August 2021
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

राज्य सरकारने 15 ऑगस्ट पासून राज्यातील सर्व व्यापार व दुकाने, हॉटेल हे रात्री 10 पर्यंत सुरू करण्याचा निर्णय घेतला परंतू कोरोनाचे निर्बंध घालून ही सूट देण्यात आली आहे, तसा आदेश राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी काढला, दरम्यान याच पार्श्‍वभूमीवर सोलापूर शहरांमध्ये कोरोणाची रुग्ण संख्या कमी आहे त्यामुळे शहरात व्यापार सुरू होणार का अशी उत्सुकता आणि चर्चा होती त्याच पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांचे सही न केलेला आणि जावक क्रमांक न टाकलेला सुधारित आदेश सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे त्यानुसार रविवार 15 ऑगस्ट पासून राज्य सरकारने दिलेल्या सूचनेप्रमाणे सोलापुरात निर्बंध हटवण्यात आल्याचं दिसून येत आहे. या आदेशात त्यांनी ….

ज्याअर्थी राज्य शासनाने कोरोना विषाणूचा (कोविड १९) प्रादुर्भाव रोखणेसाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ च्या खंड २, ३ व ४ मधील तरतुदीनुसार दिनांक १४ मार्च २०२० रोजी अधिसूचना निर्गमित केलेली आहे. सदर अधिसूचनेनुसार साथ रोग अधिनियमाच्या खंड २ (१) नुसार महानगरपालिका आयुक्त यांना नियमांची अंमलबजावणी करणेकामी सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित केलेले आहे.

मा. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी यांच्या संदर्भ क्र.३० यास अनुसरुन कोविड़ १९ चे विषाणू चा प्रादुर्भाव रोखणेकामी करावयाच्या उपाययोजनेच्या अनुषंगाने सोलापूर महानगरपालिका क्षेत्रात ब्रेक द चेन सुधारित मार्गदर्शक सूचना लागू करणेचे निर्देश प्राप्त झालेले आहे.

त्याअर्थी, मी, पि. शिवशंकर, भा.प्र.से., आयुक्त, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार व देण्यात आलेल्या सूचनेनुसार सार्वजनिक हिताच्या दृष्टिने कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखणेकामी प्रतिबंधात्मक उपाययोजनेअंतर्गत सोलापूर शहरासाठी प्राप्त निर्देशानुसार सुधारीत आदेश दि. १५/०८/२०२१ रोजी पासून पुढील आदेशापर्यंत लागू करीत करण्यात येत आहेत.

१) उपहारगृहे :

खुली अथवा बंदिस्त उपहारगृहे आसन व्यवस्थेच्या ५० टक्के क्षमतेने खालील अटीच्या पूर्ततेच्या अधीन राहून सुरु करण्याची मुभा देण्यात येत आहे.

अ उपहारगृह / बारमध्ये प्रवेश करताना प्रतिक्षा कक्षात अथवा जेवण मिळेपर्यंतच्या कालावधीत मास्कचा वापर अनिवार्य राहिल व याबाबतच्या स्पष्ट सूचना उपहारगृह आस्थापनांनी उपहारगृहात लावणे आवश्यक राहील.

ब) उपहारगृह / बारमध्ये काम करणारे आचारी, वाढपे, व्यवस्थापक व स्वच्छता कर्मचान्यांसह सर्व कर्मचाऱ्याचे कोविड प्रतिबंधक लसीकरण करणे आवश्यक राहिल व ज्या कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाच्या दोन मात्रा आणि दुसरी मात्रा घेतल्यानंतर १४ दिवस पूर्ण झाले आहे असेच कर्मचारी व व्यवस्थापक उपहारगृह / बारमध्ये काम करु शकतील तसेच या सर्व कर्मचारी व व्यवस्थापनाने उपहारगृहात मास्कचा वापर करणे अनिवार्य राहिल.

क) वातानुकुलित उपहारगृह / बार असल्यास वायुवीजनासाठी खिडक्या असल्यास कमीत कमी दोन खिडक्या किंवा दरवाजा उघडा ठेवून आतील हवा खेळती राहण्यासाठी पंखे लावणे आवश्यक राहिल. प्रसाधनगृहातही उच्च क्षमतेचा एक्झॉस्ट फॅन असणे आवश्यक राहील.

इ) उपहारगृह / बारमध्ये विहित शारीरिक अंतराचे पालन होईल यानुसारच आसन व्यवस्था करण्यात यावी. फ) उपहारगृह / बारमध्ये निर्जंतुकीकरणाची तसेच सॅनिटायझरची व्यवस्था असणे आवश्यक राहील. उपरोक्तनुसार उपहारगृहे/बार सुरु ठेवण्यास सर्व दिवस सकाळी ७.०० पासून रात्री १०.०० वा. पर्यंत मुभा देण्यात येत आहे. उपहारगृह / बारमधील भोजनासाठी ग्राहकांकडून शेवटची मागणी जास्तीत जास्त रात्री ९.०० वाजेपर्यंत घ्यावी. मात्र पार्सल सेवा रात्री ११.०० वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे.

उपरोक्त प्रमाणे देण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनेविरुध्द अथवा व्यक्तिविरुध्द कार्यवाही करणेकामी संबंधित कार्यक्षेत्रातील विभागीय अधिकारी, संबंधित परवाना विभागातील कर्मचारी, मुख्य आरोग्य निरिक्षक तसेच संबंधित पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक व त्यावरील दर्जाचे पोलीस अधिकारी यांना राहतील.

उपरोक्त प्रमाणे देण्यात आलेल्या नियमांचे पालन होत नसल्यास संबंधित आस्थापना / चालक मालक यांच्यावर प्रथम उल्लंघन करीता र.रु. १००००/- दंडाची कार्यवाही करण्यात यावी व नोटीस देण्यात येईल व द्वितीय उल्लंघन झाल्यास सदरची आस्थापना ७ दिवसांसाठी सिल करण्यात येईल.

२) दुकाने:

राज्यातील सर्व व्यापारी दुकाने सर्व दिवस सकाळी ७.०० पासून रात्री १०.०० वा. पर्यंत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे. दुकानात काम करणाऱ्या सर्व व्यवस्थापन व कर्मचाऱ्यांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाचे दोन मात्रा पुर्ण व दुसरी मात्रा झाल्यानंतर १४ दिवसाचा कालावधी पूर्ण होणे आवश्यक राहिल.

विवाह सोहळे :

अ खुल्या प्रांगणातील / लॉन वरील किंवा बंदिस्त मंगल कार्यालयातील विवाह सोहळे संबंधित प्रांगण / लॉन/ मंगल कार्यालय / हॉटेल मधील आसन व्यवस्थेच्या ५० टक्के क्षमतेने व कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे संपूर्ण पालन होईल या अटीवर मंगल कार्यालयाच्या प्रयोजनार्थ सुरु ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे. खुल्या प्रांगण / लॉन मध्ये होणाऱ्या विवाह सोहळ्यास उपस्थितांची संख्या प्रांगण किंवा लॉन क्षमतेच्या ५० टक्के परंतू जास्तीत जास्त २०० व्यक्ती या मर्यादेत असेल.

क) बंदिस्त मंगल कार्यालय / हॉटेलमध्ये उपस्थितांची संख्या क्षमतेच्या ५० टक्के परंतु जास्तीत जास्त १०० व्यक्ती या मर्यादित असेल.

ड) मात्र कोणत्याही परिस्थितीत कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन केले जात आहे याची खातरजमा करण्यासाठी व्हिडीओ रेकॉडींग करणे व आवश्यकतेनुसार सक्षम प्राधिकान्याला तपासणीसाठी उपलब्ध करुन देणे आवश्यक राहील. या निबंधाचे उल्लंघन करणाऱ्यावर तसेच संबंधित हॉटेल / कार्यालयांवर दंडनीय कारवाई तसेच संबंधित हॉटेल / मंगल कार्यालयाचा परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल.

इ) तसेच मंगल कार्यालय / हॉटेल / लॉन व्यवस्थापन / भोजन व्यवस्थापन / बँडपथक / भटजी / फोटोग्राफर्स अशा विवाह व्यवस्थेशी संबंधित सर्व सलग्न संस्था यामधील व्यवस्थापक व कर्मचारी यांचेही कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण होऊन दुसरी मात्रा घेतल्यानंतर १४ दिवस पूर्ण होणे अनिवार्य राहील व त्यानुसार ओळखपत्रासह लसीकरण प्रमाणपत्र सोबत असणे आवश्यक राहील.

उपरोक्त प्रमाणे देण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनेविरुध्द कार्यवाही करणेकामी संबंधित कार्यक्षेत्रातील विभागीय अधिकारी, मुख्य आरोग्य निरिक्षक, आरोग्य निरिक्षक तसेच संबंधित विभागाच्या पोलीस स्टेशनचे पोलिस नाईक व त्यावरील अधिकारी यांना राहतील.

उपरोक्त प्रमाणे देण्यात आलेल्या नियमांचे पालन होत नसल्यास संबंधित आस्थापना / चालक मालक यांच्यावर प्रथम उल्लंघन करीता र.रु. १००००/- दंडाची कार्यवाही करण्यात यावी व नोटीस देण्यात येईल व द्वितीय उल्लंघन झाल्यास सदरची आस्थापना ७ दिवस सिल करण्यात येईल,

 

SendShareTweetSend
Previous Post

आमदार प्रणिती शिंदेंचे “एमआयएम व वंचित” वर गंभीर आरोप ; या शब्दात केले लक्ष्य

Next Post

रिपाइंचे भविष्यात “या”पक्षासोबत युतीचे संकेत ; राजाभाऊ सरवदे म्हणाले इतके नगरसेवक महापालिकेत पाठवणार

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

रिपाइंचे भविष्यात "या"पक्षासोबत युतीचे संकेत ; राजाभाऊ सरवदे म्हणाले इतके नगरसेवक महापालिकेत पाठवणार

ताज्या बातम्या

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026

क्राईम

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1996514
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group