Friday, October 16, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

ब्रेकींग ! भाजपकडून राष्ट्रवादीचा ‘करेक्ट’ कार्यक्रम ; ”आवताडे’च्या विजयाने भाजपचे ‘समाधान’

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
2 May 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत अटीतटीच्या लढाईत भाजपचे समाधान आवताडे यांनी 3733 मतांनी विजय मिळवला, राष्ट्रवादी काँग्रेसचे भागिरथ भालके यांचा पराभव झाला. परिचारक गट विजयाचा शिल्पकार ठरला.

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष पाच राज्याच्या विधानसभा सह पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीकडे लागले होते, भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस या दोनच पक्षात थेट निवडणूक होती, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत नाना भालके यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक लागली, सुरुवातीला नाना यांच्या पत्नी सुनंदा भालके यांना राष्ट्रवादी काँग्रेस तिकीट देईल आणि ही निवडणूक बिनविरोध होईल अशी चर्चा होती, भाजप ही त्यासाठी तयार होते, मात्र भागिरथ भालके हे उमेदवारी साठी अडून बसले, त्यांनी प्रचार ही सुरू केला होता, शेवटी राष्ट्रवादी काँग्रेसला त्यांना उमेदवारी द्यावी लागली, म्हणून भाजप या निवडणुकीत उतरले, निवडणूक झाली,  कोरोनाच्या सावटात ही तब्बल 69 टक्के मतदान झाले, पाच राज्याच्या मतमोजणी सोबतच पंढरपूरची मतमोजणी होती, पहिल्या दहा फेरीत भालके व आवताडे यांच्यात एक हजाराच्या फरकाने चढउतार होत होता मात्र त्यानंतर आवताडे यांनी घेतलेले मताधिक्य कायम राहिले मताधिक्यामध्ये चढउतार होत होता, शेवटच्या 2 राउंडला उशीर झाला 36 फेऱ्यामध्ये 4100 लीड होता मात्र दोन राऊंडमध्ये तो पुन्हा कमी झाला, उलट या निवडणुकीत पंढरपूर आवताडेंना स्वीकारेल का नाही अशी  चर्चा होती मात्र उलट 4 हजाराचा लीड पंढरपूरने दिला, पण मंगळवेढ्याचे भूमीपुत्र असून त्यांना लोकांनी नाकारले, मात्र शेवटी आवताडे हे 3733 मतांनी विजयी झाले, समाधान आवताडे यांना 1लाख 8004 मते तर भागिरथ भालके यांना लाख 5 हजार 717 मते मिळाली,  शिवसेनेच्या बंडखोर अपक्ष शैला गोडसे 1607 मते, आवताडे यांचे बंधू सिद्धेश्वर आवताडे यांना  2955 मते मिळाली, नोटा मते 594 होती, विजयाच्या समीप आल्यानंतर मंगळवेढ्यात आवताडे समर्थक त्यांच्या कार्यालयाजवळ एकत्र आले त्यांनी गुलालाची उघळण केली, कोरोनाच्या संसर्ग आणि संचारबंदी यामुळे कुणी जादा जल्लोष केला नाही, त्यानंतर आवताडे पंढरपूर कडे रवाना झाले, आमदार प्रशांत परिचारक यांच्या निवासस्थानी उमेश परिचारक, प्रणव परिचारक यांची भेट घेतली, नंतर त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांच्याकडून विजयी उमेदवाराचे प्रमाणपत्र स्वीकारले, विजयी प्रमाण पत्र घेतल्यानंतर विजयी प्रतिक्रिया दिली, हा विजय सर्व मंगळवेढा व पंढरपूर तालुक्यातील जनता,कार्यकर्त्यांचा आहे जनतेने दाखवलेल्या विश्वासास सार्थ ठरवून पंढरपूर मंगळवेढ्याचा विकास करेन, 35 गावच्या पाणी प्रश्नी दिलेल्या अश्वासना प्रमाणे केंद्र स्तरावर पाठपुरावा करण्याचा शब्द दिला… इकडे मंगळवेढ्यात समाधान आवताडे यांच्या कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला प्रतिक्रिया देताना जनतेने दाखवलेल्या विश्वासाचा विजय असल्याचे सांगितले.

प्रशांत परिचारक विजयाचे शिल्पकार

आमदार प्रशांत परिचारक यांनी पंढरपूर शहर तालुक्यात आपला संपूर्ण पांडुरंग परिवार कामाला लागला आहे, त्यांचे बंधू उमेश परिचारक, चिरंजीव प्रणव परिचारक यांनी प्रचारात जीवाचे रान केले आहे, शहरातील प्रत्येकाला प्रशांत मालक हात जोडून मतदान करण्यासाठी आवाहन केले होते, पंढरपूर चा संपूर्ण पांडुरंग परिवार व्हा चेअरमन वसंतराव देशमुख, बाळासाहेब देशमुख यांनी पंढरपूर पिंजून काढला, मंगळवेढा तालुक्यातील युटोपीयन साखर कारखान्याचे सभासद, सोसायटीचे चेअरमन, पंढरपूर अर्बन बँके यांच्या माध्यमातून आवताडे यांना प्रचारात बळ दिले होते,  ही निवडणूक हातातून जाणार या भीतीने उपमुख्यमंत्री अजित पवारांना तब्बल तीनवेळा या मतदारसंघात फिरावे लागले, चार दिवस मुक्काम करावा लागला त्यामुळे समाधान आवताडे यांच्या उमेदवारीची किती धास्ती राष्ट्रवादी काँग्रेसने घेतल्याचे दिसून आले. मी पंढरपूरात राखतो मंगळवेढ्यात लीड द्या असे ते वारंवार म्हणत होते, 

प्रचारात हे मुद्दे ठरले विजयाला कारणीभूत

समाधान आवताडे यांनी आपल्या प्रचारात केवळ विकासाचा मुद्दा घेऊन सुरुवातीला प्रचार केला नंतर मात्र विरोधकांनी संत दामाजी कारखान्याच्या 19000 सभासदांचा अक्रियाशील मुद्दा उपस्थित केला तेव्हा मात्र अवताडे यांनी विठ्ठल कारखान्याच्या 650 कोटीच्या कर्जाचा मुद्दा बाहेर काढला अर्जुन बँक बुडीत प्रकरणात भालकेंना टार्गेट केले, मंगळवेढ्यातील 35 गावच्या पाणी प्रश्‍नाच्या मुद्दा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला परंतु सलग तीन निवडणुका जिंकणाऱ्या भारत भालके यांनी कोणताही प्रयत्न या पाण्यासाठी केला नाही अखेर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रातून निधी आणून या गावचा पाणीप्रश्न सोडू अशी घोषणा केली होती, त्यानंतर वातावरण फिरले, पंढरपूर भागामध्ये एमआयडिसी हाही मुद्दा या निवडणुकीत उपस्थित झाला, सर्वाधिक मुद्दा गाजला तो शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडण्याचा त्यावरून महाविकास आघाडी सरकारवर शेतकरी राजाची प्रचंड नाराजी दिसून आली.

प्रचार सभात यांनी मारली बाजी…

भाजपच्या विरोधात पंढरपूर मंगळवेढ्यात महाविकास आघाडी तील अर्ध मंत्रिमंडळ प्रचाराला आलं होतं दुसरीकडे विरोधात देवेंद्र फडणवीस यांच्या दोन्ही तालुक्यात सभा झालेल्या प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील दोन वेळा आले, हर्षवर्धन पाटील आले, चित्रा वाघ यांनी महिला प्रश्नावर सत्ताधाऱ्यांना लक्ष केले, मात्र माजी मंत्री सदाभाऊ खोत आमदार गोपीचंद पडळकर आमदार रणजितसिंह मोहिते पाटील आमदार राम सातपुते जिल्ह्याचे निरीक्षक माजी मंत्री बाळा भेगडे, जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख,  माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे रयत क्रांतीचे कार्य अध्यक्ष दीपक भोसले , संघटक शशिकांत चव्हाण,बळीराजा शेतकरी संघटनेचे माऊली हळणवर,येताळा भगत यांनी प्रचाराची संपूर्ण बाजू सांभाळून घेतली, ग्रामीण भागात सर्वाधिक मार्केट मारले ते सदाभाऊ खोत यांनी. त्यांच्या भाषणांनी ग्रामीण भागात एक नवचैतन्य निर्माण केले, आमदार पडळकर यांनी युवकांमध्ये महाविकास आघाडी विरोधात रोष निर्माण केला, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर माजी मंत्री सुभाष देशमुख माजी मंत्री विजय देशमुख आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या ही सभा झाल्या.

अजित दादा, जयंत पाटील, रोहित पवार चालले नाहीत…..

राज्यामध्ये शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस यातील पक्षाचे महाविकास आघाडीचे सरकार आहे नुकत्याच झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत महा विकास आघाडीने चांगलेच यश संपादन केले त्यामुळे या पोटनिवडणुकीत भगीरथ भालके हेच विजय होतील असा दावा राष्ट्रवादीचा होता अजित पवार यांनी तर तीन वेळा पंढरपूरचा दौरा केला चार मुक्काम या मतदारसंघात केले जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे तर अनेक दिवस मुक्कामी होते युवकांमध्ये क्रेज असलेले आमदार रोहित पवार हे सुद्धा दोन दिवस येऊन गेले मात्र या कुणाची हि जादू या मतदारसंघात चालली नाही, पालकमंत्री दत्तामामा भरणे आमदार संजय मामा शिंदे आमदार प्रणिती शिंदे यांच्या भाषणांना शिट्ट्या टाळ्या मिळवायच्या मात्र ते मतदानात रूपांतर झाले नाही.काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आलेले शिवसेनेचे गुलाबराव पाटील आले आमदार शेळके आले समाज कल्याण मंत्री धनंजय मुंडे यांच्या सभा मते मिळवण्यात कमी पडला.

भागिरथ यांना भारतनाना होता आले नाही….

मंगळवेढा पंढरपूर विधानसभा मतदार संघात आमदार भारत नाना भालके यांची क्रेझ वेगळीच होती सर्वसामान्यांमध्ये त्यांची छाप दिसून यायची मात्र त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे चिरंजीव भागीरथ भालके यांनी भांडून आपणाला उमेदवारी घेतली केवळ उमेदवारी घेतली नाही तर आपल्या वडिलांप्रमाणे त्यांनी पोशाख परिधान केला तीन गुंड्याचा सदरा, वडिलांसारखे टोपी, कपाळावर नाम वाढलेली दाढी यामुळे ते हुबेहूब भारत माना दिसायचे भाषणांमधून ही त्यांनी वडिलांप्रमाणेच आवाज काढून लोकांना भावनिक करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांचा प्रयत्न सपशेल फेल ठरला लोकांनी नानांना स्वीकारले होते परंतु बापाप्रमाणे मुलगा नसल्याने लोकांनी त्यांना स्पष्ट नाकारले.

परिचारक-आवताडे एकीचा विजय…

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा निवडणुकीत यापूर्वी 2014 व 2019 रोजी परिचारक हे एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवायचे त्यामध्ये मतविभाजन होऊन भारत भालके विजयी व्हायचे, आवताडे 45-50 हजार मते घ्यायचे आणि परिचारक 75-80 हजार , दोघांची बेरीज केली तरी 1 लाख 30 हजार व्हायची, त्यामुळे आमदार प्रशांत परिचारक म्हणायचे 33 टक्के घेतलेला विद्यार्थी पास व्हायचा आणि 67 टक्के घेतलेला नापास, शेवटी मोठ्या मनाने परिचारक यांनी मतविभाजन टाळण्यासाठी आवताडे यांना पाठिंबा दिला या दोन्ही नेत्यांनी एकी केली,  आणि हा महत्वाचा विजय संपादन केला.

SendShareTweetSend
Previous Post

मुख्यमंत्री साहेब शाळा सुरू करा, चिमुकलीचे पत्र

Next Post

माजीमंत्री लक्ष्मण ढोबळे यांना पत्नी शोक

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

माजीमंत्री लक्ष्मण ढोबळे यांना पत्नी शोक

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002501
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group