पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाने सोलापूर शहरामध्ये गुलमोहर ऑर्केस्टा अॅण्ड बार विजापूर रोड या ठिकाणी छापा टाकून एकुण ४७ आरोपी व घटनास्थळावरून रोख रक्कम २,७१,३८० रुपये ७ मोटार सायकल, ८ चार चाकी वाहने व नृत्याविष्कारासाठी वापरात आणलेले साऊंड सिस्टम व इतर साहित्य असे एकुण ५९,७८,८८० रुपयांचा माल जप्त करण्यात आले.
दि. १२/०३/२०२२ रोजी पहाटे ०३:१५ वाजता गुलमोहर ऑर्केस्टा अॅण्ड बार विजापूर रोड समोर रात्रगस्त करीत असताना गुलमोहर ऑर्केस्टा अॅण्ड बार या ठिकाणी मोठ्याप्रमाणात आवाज येत असून या ठीकाणी परवान्यामधील अटी व शर्तीचे भंग करून बेकायदेशिरपणे बार चालू असल्याची शक्यता होती. या ठिकाणची पाहणी करून सदर ठिकाणचा शहनिशा करणेकामी विशेष पोलीस पथकासह छापा टाकला असता सदर ठिकाणी नृत्याविष्कार चालु असणारे ठिकाणी आलो. तेथे स्टेजवर १३ नर्तिका अंगावर तोकडे कपडे घालून बिनधास्तपणे अश्लील हावभाव करून संगीताच्या तालावर अश्लील नृत्य करीत होत्या व ग्राहक त्यांचेकडे हातवारे करून विभत्सपणे हावभाव करून, नोटसदृष्य नकली दहा रुपयाचे नोटा नर्तीकांच्या अंगावर उथळत होते.
बारमध्ये गायक, चालक व वेटर हे संगिताच्या तालावर बारमध्ये विना परवाना महिलाना संगीताच्या तालावर नाचवत होते. १) तानाजी देवराव लकडे (बार मालक), २) आकाश चंद्रकांत जाधव ( बार चालक), ३) शिवानंद अमराळीकर (वेटर) ४) देविदास दगडु गायकवाड (पेटर) ५) गणेश दगड़ गायकवाड (वेटर) ६) अभिषेक मनोज दणाने (वेटर) यानी अश्लिल नृत्य करण्याची अपप्रेरणा देऊन ग्राहक नामे ७) मल्लिकार्जुन दुडध्या मरुळ, ८ इण्णा जटया पुजारी, रोबरकतअली मकसूद कुरेशी, १०) अमर महादेव कोजारी ११) अमितकुमार नानासाहेब मोटे, १२) सिकंदर माणिक धोत्रे, १३) मिराज जलिल कुरेशी, ५४) गौरा अब्दुल गफुर टक्कलकी १५) आकाश सत्यवान हजारे, १६) रवि प्रकाश निकम, १७) प्रसाद मल्लिकार्जुन आळंद. १८) ताज महिनुबसाब उमराणी, १९) रियाज अहमद इमामसाब पठाण, २०) सैफअली शरीफ बागवान, २१) ईब्राहीम नबी पटेल, २२) मो. इरफान मेहताबसाब पटेल, २३) नदीम बद्रुद्दीन पेंडारी, २४) अरीफ बशीर कलेगार, २५) शिरीष राम गायकवाड, २६ आकाश संजय पठारे, २७) रोहन रविंद्र गंगणे, २८) महमद ताषिक महमद जाफर तैनाली. २९) निसार अहमद इसाक सातबच्चे, ३०) संतोष बाळ रही. ३१) गौस रसुल पटेल, ३२) महेश राजकुमार ठाकुर, ३३) जब्बार खाजाभाई बागवान, ३४) अखतार हुसेन गुलाम गौस दर्जी ३५) अरबाज संपन शेख, ३६) माणिक तिप्पा रही ३७ अमितकुमार राजेंद्र समदळ. ३८) महमद जाहीद महमद ४३) अलीम दंड ३९) अनिकेत नागनाथ गोरटयाल, ४०) ईब्राहीम सलिम शेख ४१) सपन शब्बीर इरकल, ४२) सलिम जन्दार सिलगर, ४३) गणपती बसवराज पुजारी ४४) पांडुरंग अर्जुन शामल, ४५) सागर कटयाणा गायकवाड, ४६) विनोद व्यंकट सुर्यवंशी, ४७) रितेष अरविंद मारगम, ४८) यश मधुकर सारंगी, ४९) समीर रफीक शेख यांनी अश्लिल नृत्य करीत असलेल्या महिलांवर पैसे उडवून त्यांना प्रात्साहित केले म्हणून त्यांच्या विरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाणे गुर. १०६/२०२२ मा.दं.वि. सं. कलम २९४.१०२.११४ सह महाराष्ट्र हॉटेल, रेस्टॉरंट बार रूममध्ये अश्लिल नृत्यास • प्रतिबंध आणि महिलांची प्रतिष्ठा संरक्षण कायदा २०१६ कलम ३.८(१)(२)(४) अन्वये सोलापूर शहर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
या घटनास्थळावरुन रोख रक्कम २,७१,३८०/- रुपये मोटार सायकल ८ चार चाकी वाहने व नृत्याविष्कारासाठी वापरात आणलेले साऊंड सिस्टम व इतर साहित्य असे एकूण ५९,७८,८८०/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
ही कारवाई हरीष बैजल, पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि/ जीवन निरगुडे पोह/ दिलीप गालशंकर, पोको/ योगेश बर्डे, पोना/ वाजीद पटेल, पोना/ संजय साळुंखे, चालक पोको/ नरेंद्र नक्का, यांनी केलेली आहे.

















