Sunday, October 11, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

ब्रेकिंग !सोलापूर शहरात सोमवारपासून कोणतेही बदल नाहीत, महापालिका आयुक्तांनी काढला आदेश

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
1 August 2021
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर शहरात 2 ऑगस्ट सोमवार पासून व्यापाराच्या वेळेत बदल होईल अशी चर्चा होती त्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी रविवारी सायंकाळी नवे आदेश काढले आहेत त्या आदेशांमध्ये काय आहे ते पाहूयात

राज्य सरकारने पंचवीस जिल्ह्यामध्ये कोरोना निर्बंध शिथिल करण्याची भूमिका दर्शवली होती या पार्श्‍वभूमीवर सोलापूर शहरांमध्ये निर्बंध शिथिल होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले होते त्यामुळे महापालिका आयुक्त काय आदेश काढतात याचीही उत्सुकता संपूर्ण सोलापूरकरांची होती मात्र सायंकाळी साडेचारच्या सुमारास महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी स्वतंत्र प्रशासकीय घटक म्हणून त्यांना मिळालेल्या अधिकाराचा वापर करत सुधारित आदेश काढले. सोलापूर शहर हे डेल्टा प्लस व्हेरियन्ट या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर तिसऱ्या टप्प्यातच असून कोणतेही निर्बंध शिथिल केले नाहीत असे आदेशात नमूद केले आहे. दिनांक 2 ऑगस्ट सोमवार सकाळी सात वाजल्यापासून पासून ते पुढील आदेश येईपर्यंत सोलापूर शहरात आहे तेच निर्बंध कायम राहतील असे आदेशात नमूद करण्यात आले आहे त्यामुळे सोलापूर शहरातील व्यापार हा सायंकाळी चार वाजेपर्यंतच सुरू राहणार आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष जुबेर बागवान यांनी काही दिवसांपूर्वी पालकमंत्री दत्तामामा भरणे यांना निवेदन देऊन सोलापूर शहरातील निर्बंध शिथिल करावेत आणि व्यापार दुपारी चार ऐवजी रात्री सात वाजेपर्यंत सुरू ठेवावे अशी मागणी केली होती मात्र त्यावर कोणताही निर्णय अद्याप झालेला नाही.

ज्याअर्थी राज्य शासनाने कोरोना विषाणूचा (कोविड-१९) प्रादुर्भाव रोखणेसाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ च्या खंड २, ३ व ४ मधील तरतुदीनुसार दिनांक १४ मार्च २०२० रोजी अधिसूचना निर्गमित केलेली आहे. सदर अधिसूचनेनुसार साथ रोग अधिनियमाच्या खंड २ (१) नुसार महानगरपालिका आयुक्त यांना नियमांची अंमलबजावणी करणेकामी सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित केलेले आहे.

ज्याअर्थी संदर्भ क्र. १० च्या शासन मान्यतेने सोलापूर महानगरपालिका क्षेत्र हे स्वतंत्र प्रशासकीय घटक म्हणून निर्णय घेण्यास मान्यता मिळाल्याने तसेच मा. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी यांच्या संदर्भ क्र. २५ यास अनुसरुन कोविड-१९ चे विषाणू डेल्टा प्लस या व्हेरिएंट मध्ये करावयाच्या उपाययोजनेच्या अनुषंगाने सोलापूर महानगरपालिका क्षेत्रात लेव्हल-३ चे निर्बंध लागू करणेचे निर्देश प्राप्त झालेले आहे.

त्याअर्थी, मी, पि शिवशंकर, भा.प्र.से. आयुक्त सोलापूर महानगरपालिका, सोलापूर मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार व देण्यात आलेल्या सूचनेनुसार सार्वजनिक हिताच्या दृष्टिने कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखणेकामी प्रतिबंधात्मक उपाययोजने अंतर्गत सोलापूर शहरासाठी यापूर्वी दिनांक २७/०६/२०२१ रोजीचे आदेश व दिनांक २८/०६/२०२१ रोजीच्या शुध्दीपत्रकातील आदेशच दि. ०२/०८/२०२१ रोजीचे सकाळी ०७.०० वाजेपासून पुढील आदेशापर्यंत लागू करीत आहे.

सदर आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती संस्था अथवा संघटना यांचेवर भारतीय दंड संहिता (४५ ऑफ १८६०) कलम १८८ मधील तरतूदीनुसार दंडनीय / कायदेशीर कारवाईस पात्र असून आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५, साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतूदी आणि इतर कायदे आणि विनियम यानुसार कारवाई करणेत येईल. अशा व्यक्ती, संस्था अथवा संघटना यांचे विरुध्द संबंधीत पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांनी कारवाई करावी.

SendShareTweetSend
Previous Post

मिलिंद शंभरकर सारखा जिल्हाधिकारी पाहिला नाही अन् पी शिवशंकर सारखा सुलतानी अधिकारी का रे बाबा?

Next Post

ब्रेकींग ! म्हशी रस्त्यावरून गोठयात, मालक थेट तुरुंगात ; पळवा म्हशी पळवा

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

ब्रेकींग ! म्हशी रस्त्यावरून गोठयात, मालक थेट तुरुंगात ; पळवा म्हशी पळवा

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002298
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group