Tuesday, June 30, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

बार्शीचा “बिग बुल” | शेअर बाजार घोटाळयाचा आकडा 11 कोटीच्या वर ; फटेच्या ‘विशाल’फसवणुकीने सर्वच चक्रावले

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
15 January 2022
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 



बार्शी : गेल्या चार दिवसापासून चर्चेत असलेल्या शेअर बाजार लिंक्ड कोट्यावधी रुपयांच्या फसवणूकीप्रकरणी अखेर विशाल अंबादास फटे आणि त्याच्या कुटुंबियांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुरुवारी रात्री उशिरा भा.दं.वि. कलम 34, 409,417, 420 व महाराष्ट्र ठेवीदाराच्या वित्तीय संस्थांमधील हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम 1999 च्या कलम 3 अन्वये गुन्हा दाखल झाला. 


या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याने तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. मुख्य आरोपी विशाल याच्या संपर्कात आल्यानंतर त्याच्या कामात सहकार्य करणार्‍या दिपक बाबासाहेब अंबारे (रा. शेळके प्लॉट, गाडेगांव रोड, बार्शी) यानेच याबाबत फिर्याद दिली आहे.

फसवणूकीचा प्रारंभिक आकडा 5 कोटी 63 लाख 25 हजार असला तरी तो अब्जावधी रुपयामध्ये जाण्याची शक्यता आहे. ज्यांना आपला आर्थिक स्त्रोत सांगण्यामध्ये अडचणी आहेत, अशा अनेक व्यक्तींनी अजूनही पोलिसांकडे रितसर तक्रार दिलेली नाही. मात्र या प्रकरणात काय होते याकडे ते लक्ष ठेवून आहेत.


विशालची पत्नी राधिका, वडिल अंबादास, आई अलका, भाऊ वैभव यांना सहअरोपी करण्यात आले आहे. तर फिर्यादीने आपली 96,25,000 रु,  भाऊ किरण बाबासाहेब अंबारे याची 50,00,000 रु, मित्र संग्राम दिलीप मोहिते याची 3,60,20,000 रु, रोहित सूर्यकांत व्हनकळस याची  35,00,000 याची, सुनिल सुरेश जानराव याची 20,00,000रु, हणुमंत सुभाष ननवरे याची 2 लाख रुपयाची फसवणूक केल्याचे नमूद केले आहे. 


दरम्यान फसवणुकीमुळे क्षुब्ध झालेल्या गुंतवणुकीदारांनी विशालच्या अलिपूर रस्त्यावरील घरी व उपळाई रस्त्यावरील कार्यालयात जाऊन तेथील वस्तूंची तोडफोड केली. आज शुक्रवारी दिवसभरात आणखी 36 लोकांनी दिलेल्या माहितीवरून फसवणुकीचा आकडा 11 कोटी 36 लाखावर गेला आहे. विशाल देशाबाहेर पळून जावू नये म्हणून आंतरराष्ट्रीय विमानतळावर नोटीस जारी करण्यात आली आहे. तसेच त्याचे आई-वडिल-भाऊ यांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी अनेक पथके तयार केली असून ती त्याच्या मागावर आहेत. तो लवकरच पोलिसांच्या हाती येण्याची शक्यता आहे.  


विशालचे वडिल अंबादास फटे हे येथील भगवंत प्रसाद सुलाखे वाणिज्य महाविद्यालयातील निवृत्त प्राध्यापक आहेत. विशालने प्रारंभी श्री शिवाजी महाविद्यालयाच्या रस्त्यावरील मोहिते कॉम्प्लेक्समध्ये नेट कॅफे सुरु केले होते. तेथेच दिपकची त्याच्यासोबत ओळख झाली. प्रारंभी विशाल शेअर बाजारात ट्रेडिंग करत होता. त्याचे क्लासेस घेत होता. तेथे प्रचंड नफा होत असल्याचे तो सर्वांना सांगत असे. त्यामुळे फिर्यादी सह अनेकजण त्याच्याकडे आकर्षिले गेले. 


विशालने शेअर बाजारातील गुंतवणुकीसाठी अलका शेअर्स सर्व्हिसेस, विशालका कन्सल्टन्सी सर्व्हिसेस प्रायवेट लिमिटेड, जे.एम. फायनान्शियल सर्व्हिसेस अशा कंपन्या काढल्या होत्या. त्याच्या घरातील लोकच या कंपन्यामध्ये भागीदार होते. या कंपन्याच्या वेगवेगळ्या बँकेमध्ये काढलेल्या खात्यामध्ये आणि रोख, चेकव्दारे तो लोकांकडून रकमा स्वीकारत होता. मोठा परतावा देण्याचे आमिष तो दाखवित होता. दिर्घकाळ त्याने आर्थिक देवाण घेवाण दिपकच्या खात्यातून केली. त्याचे व्यवहार जवळून बघत असल्यामुळे दिपकचा त्याच्यावर विश्वास बसल्याने त्याने आपले नातेवाईक, मित्र अशा अनेक लोकांना विशाल कडे गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले.   


विशालने आकर्षक लाभाच्या वेगवेगळ्या योजना काढल्या आणि त्यात लोकांना भरमसाठ परतावाही दिला. त्यामुळे लोकांचा त्याच्यावरील विश्वास वाढतच गेला.  नोव्हेंबर महिन्यात झी हिंदुस्थान यांचे वतीने केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचे हस्ते बेस्ट टेक्नॉलाजी डेव्हलपमेंट इन अल्गो ट्रेडिंग इन इंडिया (Best Technology Development in Algo Trading in India) हा पुरस्कार देण्यात आला होता. त्यामुळेही लोकांचा त्यावरील विश्वास वाढला. त्यातून लोकांनी मिळेल त्या मार्गाने पैसे जमवून त्याच्या हवाली केले. 


10 लाखाचे वर्षानंतर 6 कोटी देण्याच्या त्याच्या योजनेने सर्वाधिक पैसे त्याने मिळविले. या योजनेतील सर्व पैसे त्याने रोख स्वरुपातच घेतले आहेत. त्याने जी.एम. फायनान्स सर्व्हिसेस (G.M.  Finance Services) नावाच्या प्रस्थापित कंपनीच्या नावाने बनावट कागदपत्रांच्या आधारे पुणे येथील खाजगी बँकेत खाते उघडले होते. त्यामध्येही अनेक गुंतवणूकदारांनी पैसे जमा केले होते.

मात्र मूळ कंपनीला त्याचा हा उद्योग माहित झाल्यानंतर त्यानी तक्रार करुन हे खाते बंद करायला लावले होते. गेल्या शुक्रवारी 7 जानेवारी रोजी पुणे येथील मामाला ऍटक आल्यामुळे त्यांना भेटण्यास जात आहे. असे सांगून विशालने बार्शी सोडली. त्यानंतर 9 तारखेला त्याचा मोबाईल बंद झाला. त्यानंतर त्याचा कसलाच संपर्क झाला नसल्याचे सांगण्यात येत आहे. 

 बार्शी शहरातील नागरिकांची अधिक व्याज देतो असे सांगून फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणातील विशाल अंबादास फटे यांची पाच बँकातील खाती पोलीसांनी बँकांना पत्र देवून गोठवली आहेत. दरम्यान यात फसवणूक झालेले अनेकजण पुढे येत असून आज बार्शी पोलीस ठाण्याकडे तक्रारदारांची गर्दी झाली होती.


विशाल फटे यांनी अलका शेअर्स नावाची मार्केटींग कंपनी स्थापन केली. या कंपनी मार्फत गुंतवणूकदारांना अधिक व्याज देण्याचं सांगत पुढील तारखेचा चेक आणि स्टॅम्पवर परतावा देण्याबाबत लिहून देत असे. यात अनेक जणांनी लाखो रुपये गुंतवणूक संख्या 600 च्यावर असल्याचं दिसून येत आहे. पोलीसांनी विशाल फटे यांच्या विरोधात तक्रारी आल्यानंतर तपास सुरु केला. त्यांना हुडकलं, सापडले नाही, मोबाईल बंद होता तेंव्हा त्यांची खाती बँकांकडून सील करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर | भाजपची नरेंद्र काळे यांच्यावर मोठी जबाबदारी | विजयकुमार देशमुखांनी पेढा भरवून दिल्या शुभेच्छा

Next Post

सोलापूर जिल्हयात २५० शाळां मध्ये “विद्याजंली” उपक्रम | महाविद्यालय घेणार शाळा दत्तक

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूर जिल्हयात २५० शाळां मध्ये "विद्याजंली” उपक्रम | महाविद्यालय घेणार शाळा दत्तक

ताज्या बातम्या

सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

28 June 2026
अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

26 June 2026
धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

18 June 2026
धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

12 June 2026
सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026
बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026
आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

3 June 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

Our Visitor

1986286
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group