सोलापूर जिल्ह्यातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे चे ज्येष्ठ नेते, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष डी एन गायकवाड यांचे कोरोना या आजाराने निधन झाले रविवारी कोरूना झाल्याने त्यांना सोलापूर मार्कंडेय सहकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान मंगळवारी दुपारच्या सुमारास त्यांचे निधन झाले, निधन झाल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांकडून समजली .आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते व दक्षिण सोलापूर तालुक्यातील एक मोठं राजकीय व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती , रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष म्हणून सध्या त्यांच्याकडे जबाबदारी होती सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे दहा वर्षे ते संचालक होते तसेच बक्षी हिप्परगे गावचे सुमारे वीस वर्षे त्यांनी सरपंच पद भूषवले आहे. आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता हरपला याचे दुःख सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे.
ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू
ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...














