प्रभाग 26 मधील कल्याण नगर भाग एक व दोन येथे हदवाढ झाल्यापासून कोणत्याच सुविधा झाल्या नव्हत्या, नगरसेविका राजश्री चव्हाण निवडून आल्यापासून सदर नगरामध्ये ड्रेनेज व पाण्याची पाईपलाईन त्यांचे फंडातून व आमदार सुभाष बापू देशमुख यांचे आमदार फंडातून करून घेतले होते. व नंतर अंतर्गत रस्ते करणे जरुरीचे होते या नगरामधील नागरिक हे नगरसेविका राजश्री चव्हाण यांना अनेक निवेदने दिली होती त्याची दखल घेऊन सामाजिक कार्यकर्ते श्रीशैल हिरेपट व नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी नगरामध्ये अंतर्गत रस्ते करण्यासाठी आमदार सुभाष देशमुख यांना निवेदन दिले होते व सतत पाठपुरावा केला होता. त्याची दखल घेत आमदार देशमुख यांनी जवळपास 60 लाखाचा निधी उपलब्ध करून दिला व प्रत्यक्ष कामाचे उद्घाटन त्यांच्याच हस्ते करण्यात आले.
त्यावेळी तेथे जमलेले अनेक ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग यांनी आपले मनोगत व्यक्त केले की आम्ही जवळपास 32 वर्षापासून सदर नगरामध्ये रहात असून आमच्या नगराकडे कोणीच लक्ष देत नव्हते व प्रत्येक निवडणुकीत आम्हाला फक्त आश्वासन शिवाय काहीच मिळत नव्हते.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात जूळे सोलापुरातील अनेक नगरासाठी मंजूर झालेला निधी स्थगिती दिल्यानेच जुळे सोलापूरचा विकास खुंटला होता. परंतु आता महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील शिंदे-फडणवीस सरकार आल्याने विकास कामे जोमाने होत आहेत त्यामुळे महाराष्ट्रातील जनता खुश आहेत असे मनोगत नगरातील ज्येष्ठ नागरिक, महिलावर्ग,तरुण वर्ग यांनी बोलून दाखवले.
त्यावेळी मंडल अध्यक्ष महेश देवकर, दक्षिण सरचिटणीस शिवराज सरतापे, विशाल गायकवाड, श्रीशैल हिरेपट, आनंद बिराजदार, परमेश्वर माळगे, अनुराधा खारे, शिवाजी काळे तसेच सदर नगरातील असंख्य ज्येष्ठ नागरिक, महिलावर्ग, तरुणवर्ग, उपस्थित होते व त्यांच्या नगराचा कायापालट होत असताना त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसडुन वाहत होता.
















