Monday, October 12, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

“पैलवान-शाब्दी”ला टफ देण्यासाठी काँग्रेसचा हा ‘बॉस’ मैदानात येणार ?

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
2 July 2021
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर | 2014 ची विधानसभा निवडणूक, 2017 ची महानगरपालिका निवडणूक व  2019 ची विधानसभा निवडणूक पाहिली तर सोलापूर शहरांमध्ये मुस्लिम समाज काँग्रेसपासून बराचसा दूर गेल्याचं दिसून येतं. याला कारण म्हणजे एमआयएम हा पक्ष आहे. केवळ अपवाद हा प्रभाग क्रमांक 14 मधील पोटनिवडणुकीचा आहे. या ठिकाणी पोटनिवडणुकीत काँग्रेस विरुद्ध एमआयएम अशी लढत झाली मात्र काँग्रेसमधील सर्व नेत्यांनी एकीच्या जोरावर एमआयएमला धूळ चारली होती.

कॉंग्रेस पक्षातील बरेच जण एमआयएम मध्ये गेले, त्याचा मोठा फटका बसला आणि महापालिकेतील सत्ता गेली. मात्र आता एमआयएमचे नेते नगरसेवक तौफिक शेख हेसुद्धा राष्ट्रवादीचा मार्गावर आहेत. एमआयएम शहराध्यक्ष फारूक शाब्दी यांनी आता संपुर्ण एमआयएम पक्ष ताब्यात घेतला आहे, महापालिकेच्या निवडणूकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे, पक्षाला यंदा  काहीही करून साम-दाम वापरून रिझल्ट द्यायचा अशी जोरदार तयारी फारूक शाब्दी यांनी केली आहे. 

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडे जरी मुस्लिम समाजाचा कार्यकर्ता वर्ग मोठा असला तरी तोफिक शेख यांच्या माध्यमातून ताकद वाढवण्याचे नियोजन केले आहे, काँग्रेस पक्षाकडे ही मुस्लिम समाजातील नेत्यांची मोठी गर्दी आहे मात्र हे नेते पक्षाला मतदान मिळवून देण्यात कमी पडतात, काँग्रेस पक्षाचा अल्पसंख्यांक विभाग म्हणावा तितका सक्रिय दिसून येत नाही. नगरसेवकपद व अल्पसंख्यांक शहराध्यक्षपद हे एकाच व्यक्तीकडे असल्याने त्यांना काम करताना अडचणी येतात, याचा विचार करून काँग्रेस श्रेष्ठींनी सोलापुरात अल्पसंख्यांक अध्यक्ष बदलण्याचे ठरवल्याची माहिती कार्यकर्त्याकडून मिळाली. 

अल्पसंख्यांक शहर अध्यक्ष पदासाठी अनेक कार्यकर्ते इच्छुक आहेत, यामध्ये विजापूर वेस, बाराईमाम चौक ,किडवाई चौक परिसरात मुस्लिम समाजात चांगली ओळख आणि प्रतिमा असलेल्या जुबेर कुरेशी अर्थात ‘झेड बॉस’ यांच्या गळ्यात हे पद पडेल अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत अतिशय झोकून देऊन काम केले होते, आमदार प्रणिती शिंदे यांच्या अत्यंत निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये कुरेशी यांचा समावेश असल्याचं बोललं जातंय.

अल्पसंख्यांक शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांमध्ये जुबेर कुरेशी यांचे नाव आघाडीवर आहे, आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर जुबेर कुरेशी यांना पक्ष गिफ्ट देण्याची शक्यता असून काँग्रेसने पैलवान-शाब्दी यांच्याविरोधात आता आपला ‘झेड बॉस’ मैदानात उतरवण्याचे ठरवल्याने आगामी निवडणुकांमध्ये चांगलीच रंगत पाहायला मिळणार आहे. मुस्लिम समाजात जाऊन त्यांचे प्रश्न, समस्या समजून घेऊन विशेष करुन युवक वर्गांना पुन्हा काँग्रेसकडे वळविण्याची मोठी जबाबदारी कुरेशी यांना पार पाडावी लागणार आहे.

SendShareTweetSend
Previous Post

फ्लॅश ! शनिवार-रविवारी सोलापूर शहर बंदच ; महापालिका आयुक्तांचे काय आहेत आदेश पहा

Next Post

ब्रेकींग ! पोलीस आयुक्तांचा आदेश ; शहरात कडक संचारबंदी राहणार

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

ब्रेकींग ! पोलीस आयुक्तांचा आदेश ; शहरात कडक संचारबंदी राहणार

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002352
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group