सोलापूर : जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा जिल्ह्याचा पहिला दौरा निश्चित झाला आहे. मंगळवार 4 ऑक्टोबर रोजी ते दौऱ्यावर येत आहेत.
3 ऑक्टोबर रोजी ते पंढरपूर येथे मुक्कामी आहेत. मंगळवारी सकाळी 9 वाजता ते श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेणार आहेत. सकाळी साडे दहा वाजता त्यांचे सोलापूर येथे आगमन होणार आहे.
छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, चार हुतात्मा स्मारक, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करतील, त्यानंतर सिद्धेश्वर मंदिरात दर्शन घेतील. पुढे नियोजन भवनात जनावरांच्या लम्पि आजाराबाबत आढावा बैठक नंतर मुख्यमंत्री सडक योजनेची आढावा बैठक घेणार आहेत. तसेच पंढरपूर विकास आराखडा सादरीकरण व बैठक होणार आहे.
दुपारी पाहून एक वाजता हेरिटेज मंगल कार्यालय येथे जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांच्यासोबत आढावा बैठक घेतल्यानंतर पुन्हा नियोजन भावनांमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक घेणार आहेत. पहा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा संपूर्ण दौरा




















