महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या (१ जून) वाढदिवसानिमित्त सोलापुरातील राष्ट्रवादीचे माजी गटनेते किसन जाधव व माजी नगरसेवक नागेश गायकवाड आणि इच्छा भगवंताची स्पोर्ट्स क्लब चेतन गायकवाड यांच्या संयुक्त विद्यमाने मामाश्री चषक 2022 लेदर बॉल टी 20 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, याअंतर्गत सोलापूर मधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुल (रेल्वे मैदान) येथे दीपक सीसी विरुद्ध एसएसआय या दोन संघादरम्यान अंतिम सामना पार पडला व यात शेवटच्या चेंडूवर दीपक संघाने विजेतेपद पटकावले आणि मानाच्या पहिल्या वहिल्या मामाश्री चषकावर नाव कोरले.
कोरोनाच्या दोन वर्षाच्या कालावधीनंतर व सोलापुरात जवळपास तीन वर्षानंतर अशी लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती व यात एकूण आठ संघाने भाग घेतला होता व एकूण पंधरा सामने पार पडले.
अगदी शेवटच्या चेंडू पर्यंत रंगलेल्या अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना दीपक सीसी संघाने २० षटकात ७ बाद १९६ धावा केल्या होत्या, या धावांचा पाठलाग करताना एस एस आय संघाला शेवटच्या १ चेंडूवर ५ धावांची गरज होती परंतु फलंदाज बाद करत दीपक सीसी संघाने ४ धावांनी सांघिक बळाच्या जोरावर विजेतेपद पटकाविले. (एस एस आय : २० षटकात ९ बाद १९२)
अंतिम सामना झाल्यावर प्रमुख पाहुणे पत्रकार समाधान वाघमोडे, पत्रकार रवी मस्के, सत्तार सय्यद व प्रमुख आयोजक नागेश गायकवाड तसेच सत्यम स्पोर्टसचे सतिश भोसले यांच्या प्रमुख हस्ते बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडला.
आयोजकांच्या वतीने देण्यात येणारे अंतिम सामन्यातील विजेत्या दीपक संघाला पत्रकार समाधान वाघमोडे यांच्या हसत अतिशय सुंदर असा चषक तसेच 15000 रुपये रोख व उपविजेत्या एस एस आय संघाला सत्तार सय्यद यांच्या प्रमुख हस्ते चषक व 11 हजार रुपये रोख देण्यात आले तसेच स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज – समीर शेख, उत्कृष्ट गोलंदाज – अंबादास तोरा, अंतिम सामन्यातील सामनावीर – समीर शेख व मालिकावीर – सईद जहागीरदार यांना पुरस्कृत करण्यात आले.
बक्षीस वितरण पूर्वी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत सत्कार संयोजक व इच्छा भगवंताची स्पोर्ट्स क्लब च्या वतीने करण्यात आला.
इच्छा भगवंताची स्पोर्ट्स क्लबचे प्रमुख तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश चिटणीस चेतन गायकवाड व त्यांचे मित्र परिवार किरण शिंदे, अमोल जगताप, लकी चव्हाण, फिरोज पठाण, ऋषभ प्याटी, ऋषी येवले यांनी ही स्पर्धा संयोजक निलेश गायकवाड, सचिन गायकवाड, नबीलाल पटेल यांच्या सहकार्याने अतिशय व्यवस्थितपणे ही स्पर्धा पार पाडली. बक्षीस वितरण समारंभाचे सूत्रसंचालन राष्ट्रवादी सोशल मीडिया जिल्हाअध्यक्ष मिलिंद गोरे यांनी केले.
संक्षिप्त धावफलक :
दीपक सीसी : २० षटकात ७ बाद १९६
समीर शेख ९१ धावा, वसीम शेख २८ धावा, लखन गावडे १९ धावा
अंबादास तोरा २४/३ बळी, सत्यजित जाधव २ बळी, प्रथमेश राठोड १ बळी
एस एस आय : २० षटकात ९ बाद १९२
निखिल धोरणाल 51 धावा दीपक राजूल 46 धावा राहुल मंजेली 21 धावा
सईद जहागीरदार ३ बळी, संतोष नलावडे २ बळी, लखन गावडे वसीम सौदागर अजहर अलगूर मुन्ना शेख प्रत्येकी एक बळी.


















